रिक्त पदांचे ओझे सांभाळून लसीकरणाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:29 AM2021-04-13T04:29:23+5:302021-04-13T04:29:23+5:30
लांजा : तालुक्यातील वाडीलिंबू, भांबेड, साटवली, रिंगणे, शिपोशी, जावडे प्राथमिक आरोग्य केंद्र व लांजा ग्रामीण रुग्णालय तसेच एका खासगी ...
लांजा : तालुक्यातील वाडीलिंबू, भांबेड, साटवली, रिंगणे, शिपोशी, जावडे प्राथमिक आरोग्य केंद्र व लांजा ग्रामीण रुग्णालय तसेच एका खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. एकीकडे काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव, तर दुसरीकडे रिक्त पदांचा ताण आहे. तरीही लांजा तालुक्यात लसीकरणाची माेहीम यशस्वीपणे राबवण्यात आली.
तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तालुक्यातील रिक्त पदांमुळे आराेग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. वैद्यकीय अधिकारी यांचे १ पददेखील रिक्त आहे. तरीही आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपले काम करत आहेत.
वैद्यकीय अधिकारी गट १ - मंजूर जागा १३ आहेत, तर भरण्यात आलेल्या जागा ९ आहेत. त्यामध्ये १ रिक्त शिपोशी, १ रिक्त भांबेड, १ रिक्त साटवली, १ रिक्त जावडे अशी आराेग्य अधिकाऱ्यांची एकूण ४ पदे आहेत. आरोग्य सहाय्यक ( पुरुष) जिल्हा परिषदेच्या मंजूर जागा १०, भरण्यात आलेल्या जागा १०, रिक्त जागा ०, आरोग्य सहाय्यक ( पुरुष) मलेरिया मंजूर जागा ३, भरण्यात आलेल्या जागा ३, रिक्त ०, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मंजूर जागा ६ , भरण्यात आलेल्या जागा १ , रिक्त जागा ५, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( टी. बी. ) मंजूर जागा १, भरण्यात आलेली जागा १, आरोग्य सहाय्यक (स्त्री) मंजूर जागा ६, भरण्यात आलेल्या जागा ६, रिक्त जागा ०, आरोग्य सहाय्यक (एनआरएचएम) मंजूर जागा १, भरण्यात आलेली जागा १, औषध निर्माण अधिकारी मंजूर जागा ६, भरलेल्या जागा २, तर शिपोशी, साटवली, शिपोशी, वाडीलिंबू या चार ठिकाणी जागा रिक्त आहेत.
कनिष्ठ सहाय्यकांच्या सर्वच्या सर्व ७ जागा भरण्यात आल्या आहेत. वाहन चालक ( कंत्राटी )च्या मंजूर ६ जागा भरलेल्या आहेत. आरोग्य सेविका ( नियमित ) मंजूर जागा ३४, भरण्यात आलेल्या जागा २९ असून, आरगाव , कुरंग, लांजा, व्हेळ उपकेंद्र येथील पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्यसेविका (एनआरएचएम ) मंजूर सर्व ७ जागा भरण्यात आल्या आहेत. आरोग्यसेवक (पुरुष) जिल्हा परिषदेच्या मंजूर जागा १६ असून, १५ जागा रिक्त आहेत, तर कोचरी येथील पद रिक्त आहे. आरोग्यसेवक (पुरूष) राज्यस्तर मंजूर जागा १२ असून, वाकेड, तळवडे, लांजा, साटवली, पुनस, हर्चे येथील पदे रिक्त आहेत. परिचर मंजूर जागा १९ असून, ११ रिक्त आहेत. स्त्री परिचर मंजूर पदे ६ असून, ४ रिक्त आहेत. साटवली, भांबेड येथील पदे भरण्यात आली आहेत. सफाई कामगार मंजूर जागा ६ असून, १ रिक्त आहे. जावडे, साटवली, भांबेड, रिंगणे, शिपोशी येथील पदे भरण्यात आलेली आहेत. तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात शिपाई पद रिक्त आहे.
चाैकट
मंजूर पदे १६५
भरलेली पदे ११३
रिक्त पदे ४५
चाैकट
लांजा तालुक्यातील ३२ आरोग्य सेविका, २१ आरोग्य सेवक, ११ आरोग्य सहाय्यक, ५ आरोग्य सहाय्यिका, ११२ आशा स्वयंसेविका, ५ गटप्रवर्तक, २२५ अंगणवाडी सेविका कोरोना प्रादुर्भावाविषयी जनजागृती करत आहेत.
कोट
सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आपली कोरोना चाचणी करुन घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखले जाऊ शकते. कोरोनासारखा आजार लपवून ठेवला तर स्वतःच्या व इतरांचा जीवदेखील धोक्या येऊ शकतो.
डॉ. मारुती कोरे, तालुका आरोग्य अधिकारी, लांजा