पावसमध्ये तरुणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:37+5:302021-08-26T04:33:37+5:30

पावस : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मतदार संघातील १८ ते २९ वयोगटातील तरुणांसाठी कोरोना ...

Vaccination of young in the rain | पावसमध्ये तरुणांचे लसीकरण

पावसमध्ये तरुणांचे लसीकरण

Next

पावस : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मतदार संघातील १८ ते २९ वयोगटातील तरुणांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे. बुधवारी रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे ५६० जणांचे लसीकरण बुधवारी करण्यात आले.

मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आपल्या मतदार संघातील एकही नागरिक लसीपासून वंचित राहू नये, त्यासाठी जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी आश्वासन दिले.

बुधवारी पावस जिल्हा परिषद गटातील पावस व गावखडी येथे लसीकरण करण्यात आले. यावेळी पावसमधील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संतोष कांबळे, पावसचे डॉ. माणिक बच्चे, डॉ. तेंडुलकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महावितरणचे कर्मचारी, पूर्णगड सागरी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सुरेश गावित यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, युवासेनेचे तालुकाप्रमुख तुषार साळवी, पंचायत समिती सदस्य सुनील नावले, जिल्हा परिषद सदस्य आरती तोडणकर, विभाग प्रमुख किरण तोडणकर, युवासेना विभागप्रमुख आनंद (नंदू) भाटकर, नाखरेचे सरपंच विजय चव्हाण, पावस उपसरपंच प्रवीण शिंदे, सुभाष पावसकर, युवासेनेचे सचिन भाटकर, नीलेश गजने, तेजस गुरव, अमॆय पाथरे, प्रज्ञेश देवळेकर, कल्पेश नार्वेकर, तेज खातू व युवा सेनेचे सर्व कार्यकर्ते तसेच पावसच्या सरपंच आरोही गुरव, ग्रामपंचायत सदस्य मनीष भाटकर, चेतना सामंत व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, युवा विभागप्रमुख आनंद भाटकर व त्यांची टीमने मोलाचे योगदान दिले.

Web Title: Vaccination of young in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.