Valentine Day 2018 : रत्नागिरीत दुकाने सजली, २० रूपयांपासून २५० रूपयांपर्यंतची ग्रिटींग्ज बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 05:37 PM2018-02-13T17:37:13+5:302018-02-13T17:44:09+5:30
व्हॅलेंटाईन डे बुधवारी १४ फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याने रत्नागिरी शहरातील गिफ्ट शॉपी सजल्या आहेत. गुलाबी, लाल रंगाचे पिलो, फुले, भेटवस्तू, शिवाय चॉकलेटस् विक्रीसाठी आली आहेत. बुधवारी व्हॅलेंटाईन डे असल्याने युवक-युवतींची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे.
रत्नागिरी : व्हॅलेंटाईन डे बुधवारी १४ फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याने रत्नागिरी शहरातील गिफ्ट शॉपी सजल्या आहेत. गुलाबी, लाल रंगाचे पिलो, फुले, भेटवस्तू, शिवाय चॉकलेटस् विक्रीसाठी आली आहेत. बुधवारी व्हॅलेंटाईन डे असल्याने युवक-युवतींची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे.
प्रेमाचा दिवस साजरा करताना युवक-युवती यादिवशी आपल्या प्रियजनांना छानशी भेट देतात. पती-पत्नीसाठीही हा दिवस खास आहे. परगावी राहणाऱ्यांना प्रेमाचे संदेश देण्याकरिता भेटकार्डदेखील बाजारात उपलब्ध आहेत. २० रूपयांपासून २५० रूपयांपर्यतची ग्रिटींग्ज बाजारात उपलब्ध आहेत.
हार्टशेप, लिपशेप पिलोदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रेमाची अभिव्यक्ती करण्यासाठी गुलाबी, लाल रंगाचे वेलव्हेटचे छोट्या-मोठ्या आकारातील पिलो एकमेकांना भेट देण्यात येतात. २५० रूपयांपासून २५०० रूपयांपर्यंत या पिलोंच्या किंमती आहेत. गिफ्ट शॉपीबाहेर अडकवण्यात आलेल्या या पिलो ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
याशिवाय अन्य भेटवस्तूदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कृत्रिम गुलाबाची फुले तसेच गुलाबाच्या फुलांमध्ये अंगठीची डबी असलेली फुले यांनादेखील मागणी होत आहे. सध्या व्हॅलेंटाईन डेवर बंधन नसल्यामुळे युवक-युवती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत खुलेआम भेटवस्तूंची खरेदी करत आहेत.