कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार आठवड्यातून तीनच दिवस

By मनोज मुळ्ये | Published: June 8, 2024 07:20 PM2024-06-08T19:20:55+5:302024-06-08T19:21:33+5:30

रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या दोन सुपरफास्ट एक्स्प्रेस दि. १० जून ...

Vande Bharat, Tejas Express will run only three days a week on the Konkan Railway route | कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार आठवड्यातून तीनच दिवस

कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या दोन सुपरफास्ट एक्स्प्रेस दि. १० जून २०२४ पासून ऑक्टोबर अखेरपर्यंत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहेत. पावसाळी वेळापत्रकामुळे हा बदल करण्यात आला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी पावसाळी वेळापत्रक लागू होते. कोकणात कोसळणारा मुसळधार पाऊस, मार्गावर दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका या गोष्टींचा विचार करता कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी १० जून ते ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाते. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेगावर नियंत्रण आणले जाते. याच कारणामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी मडगाव (२२२२९/२२२३०) वंदे भारत एक्स्प्रेस, तसेच मुंबई सीएसएमटी -मडगाव (२२११९/२२१२०) या दोन गाड्या १० जून २०२४ पासून कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रक संपेपर्यंत ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहेत.

इतर वेळी यातील वंदे भारत एक्स्प्रेस ही आठवड्यातून सहा दिवस, तर तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून पाच दिवस चालवण्यात येते. मात्र, कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही गाड्या आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहेत.

Web Title: Vande Bharat, Tejas Express will run only three days a week on the Konkan Railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.