पर्यटकांसाठी एमटीडीसीच्या विविध सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:33 AM2021-09-26T04:33:45+5:302021-09-26T04:33:45+5:30
- मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकिंग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ...
- मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार
एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकिंग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकिंग सुविधा उपलब्ध होण्यासाठी मेक माय ट्रीप आणि गो आय बीबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरून कोठूनही आरक्षित करता येणार आहेत. महाराष्ट्रात स्काय डायव्हिंग साहसी क्रीडा प्रकार सुरू करण्याच्या दृष्टीने स्काय-हायसोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यासोबतही आज सामंजस्य करार करण्यात आला आहे.
....................
एमटीडीसी-गणपतीपुळे दर्शन उपक्रम...
एमटीडीसीने दोन छोट्या बॅटरी ऑपरेटेड कार उपलब्ध करून दिल्या आहेत. एका वेळी पाच जण या कारमध्ये बसू शकतात. या कारच्या माध्यमातून एमटीडीसी ‘एमटीडीसी - गणपतीपुळे दर्शन’ उपक्रम सुरू करणार आहे. एमटीडीसीचा गणपतीपुळे येथे १०० एकरचा निसर्गरम्य परिसर आहे. या भागात ४ ते ५ सेल्फी पाॅइंट ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे हा परिसर पर्यटकांनाही फिरताना पाहायला मिळणार आहे.
कोटसाठी
दिवाळीसाठीही कोकणातील एमटीडीसीच्या हरेहरेश्वर, वेळणेश्वर, गणपतीपुळे आणि तारकर्ली आदी ठिकाणी ७० ते ८० टक्के आगाऊ आरक्षण करण्यात आले आहे. धार्मिक स्थळे खुली झाल्यास अगदी ९० ते ९५ टक्के आरक्षण होईल. आता कोरोनाचे संकट टळू लागल्याने पर्यटनालाही गती येईल, असा आशावाद वाटतो आहे.
-दीपक माने, विभागीय व्यवस्थापक, कोकण विभाग, एमटीडीसी