मनसेतर्फे रत्नागिरीत विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:23+5:302021-06-19T04:21:23+5:30

रत्नागिरी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण ...

Various programs in Ratnagiri by MNS | मनसेतर्फे रत्नागिरीत विविध कार्यक्रम

मनसेतर्फे रत्नागिरीत विविध कार्यक्रम

Next

रत्नागिरी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले.

रत्नागिरी तालुका व शहराच्या वतीने शहराध्यक्ष सतीश राणे, उप शहर अध्यक्ष सिद्धेश धुळप, मयुरेश मडके विभाग अध्यक्ष अक्षय माईन, शैलेश मुकादम तसेच त्रिमूर्ती कारचे मालक संकेत बंदरकर यांच्या सहकार्याने शिर्के हायस्कूल कोविड टेस्टिंग सेंटर येथील डाॅक्टर, नर्स, वाॅर्डबाॅय यांना छत्री वाटप करण्यात आले तसेच कोविड काळात झटत असलेल्या सर्व स्टाफचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच (रोजगार व स्वयंरोजगार विभाग) रुपेश जाधव यांच्या वतीने शहरातील सामाजिक न्याय भवन येथील शासकीय कोविड रुग्णालयाला वॉशिंग मशीन भेट देण्यात आली. उपशहर अध्यक्ष अमोल श्रीनाथ, महिला उपशहर अध्यक्ष द्वारका नंदाने यांच्यावतीने माहेर संस्थेला मोफत २०० किलो धान्य वाटप तसेच तेल, साखर देण्यात आली.

या प्रसंगी मनसे दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष रूपेश सावंत, रोजगार स्वयंरोजगार विभागाचे रुपेश जाधव, एसटी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुनील साळवी, शहर अध्यक्ष सतीश राणे, मनसे माजी तालुका अध्यक्ष सचिन शिंदे, महिला शहर अध्यक्षा अंजली सावंत, महिला उपशहर अध्यक्ष द्वारका नंदाने, उप शहर अध्यक्ष मयुरेश मडके, उप शहर अध्यक्ष सिद्धेश धुळप, उप शहर अध्यक्ष अमोल श्रीनाथ, तालुका संघटक जयेश दुधरे, शहर सचिव दादा सावंत, विभाग अध्यक्ष अक्षय माईन, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, शाखा अध्यक्ष अजिंक्य केसरकर, संकेत बंदरकर, उप तालुका संघटक संदीप बलेकर, विभाग संघटक किशोर कुळ्ये व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Web Title: Various programs in Ratnagiri by MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.