संगमेश्वरातील दराेड्याच्या तपासासाठी विविध पथके तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:02+5:302021-07-11T04:22:02+5:30

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कांजीवरा येथील दराेड्यानंतर जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ...

Various teams formed to investigate the incident at Sangameshwar | संगमेश्वरातील दराेड्याच्या तपासासाठी विविध पथके तयार

संगमेश्वरातील दराेड्याच्या तपासासाठी विविध पथके तयार

Next

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कांजीवरा येथील दराेड्यानंतर जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी घटनेची माहिती घेऊन दराेडा उघडकीस येण्यासाठी विविध पथके तयार केली आहेत.

कांजीवरा येथील नुरल हाेदा मशहूर अली सिद्दिकी यांच्या घराच्या दरवाजाचा कडी लाेखंडी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला हाेता. यावेळी पिस्तुलीचा धाक दाखवत चाेरट्यांनी ५,३८,१०० रुपयांचे साेन्याचे दागिने, राेख रक्कम आणि माेबाईल लांबवल्याची घटना ९ जुलैराेजी पहाटे घडली. जबरदस्तीने चाेरी करून पाच काेटी रुपयांची खंडणी मागून मुलाला ठार मारून टाकण्याची धमकी दिली हाेती. या घटनेनंतर संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली हाेती. या घटनेची माहिती मिळताच पाेलीस अधीक्षक डाॅ. गर्ग यांनी घटनास्थळी भेट दिली. डाॅ. गर्ग यांच्यासाेबत देवरूख पाेलीस स्थानकाचे पाेलीस निरीक्षक मारुती जगताप, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पाेलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा हाेते. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी पाेलीस अधीक्षक डाॅ. गर्ग यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच गुन्ह्याचे तपासी अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना केल्या.

Web Title: Various teams formed to investigate the incident at Sangameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.