वर्षा घाग यांना ‘बेस्ट टीचर’ सन्मान; बसणी शाळेचाही ‘बेस्ट स्कूल’ने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:30 AM2021-05-14T04:30:44+5:302021-05-14T04:30:44+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन - मानवता विकास संस्थेच्या ...

Varsha Ghag honored with 'Best Teacher' award; Basani School was also honored with 'Best School' | वर्षा घाग यांना ‘बेस्ट टीचर’ सन्मान; बसणी शाळेचाही ‘बेस्ट स्कूल’ने गौरव

वर्षा घाग यांना ‘बेस्ट टीचर’ सन्मान; बसणी शाळेचाही ‘बेस्ट स्कूल’ने गौरव

Next

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन - मानवता विकास संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा संदेश घाग यांना लिफ फाॅवर्ड या राज्यस्तरीय संस्थेचा ‘बेस्ट टीचर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच बसणी शाळेलाही बेस्ट स्कूल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद शाळांसाठी इंग्लिश रिडींग उपक्रमाबाबत बसणी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना गेले वर्षभर सहभागी करून घेण्यात आलेले होते. ‘लिफ फाॅवर्ड’ या संस्थेच्या रत्नागिरीतील सदस्या रेवती वैद्य तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन - मानवता विकास संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा घाग यांनी या उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले.

या उपक्रमाबद्दल लिफ फाॅवर्ड या संस्थेने वर्षा घाग यांना ‘बेस्ट टीचर’ आणि बसणी शाळेला बेस्ट स्कूल पुरस्काराने सन्मानित केले आहे. याबद्द्ल वर्षा घाग यांचे तसेच शाळेचे काैतुक करण्यात येत आहे.

यासाठी १३ रोजीच्या शोभना फोल्डरला वर्षा घाग नावाने फोटो आहे.

Web Title: Varsha Ghag honored with 'Best Teacher' award; Basani School was also honored with 'Best School'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.