चिपळुणातील वाशिष्ठी पूल आज रात्री पुन्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:54+5:302021-06-25T04:22:54+5:30
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेख येथील वाशिष्ठी पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी ...
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेख येथील वाशिष्ठी पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत पुलावरील वाहतूक बंद केली जाणार असून, पेठमाप फरशी येथून पर्यायी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा चिपळूण बहादूरशेख येथील वाशिष्ठी पूल जीर्ण झाला असून, तो धोकादायक बनला आहे. अतिवृष्टीवेळी दरवर्षी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जातो. परंतु, आता या पुलाच्या बाजूलाच नवीन पूल उभारण्याचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे. १५ जूनपर्यंत हा पूल वाहतुकीला खुला होणार होता. परंतु, लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेल्यामुळे कामाची गती मंदावली आहे. आता काम दिवस-रात्र सुरू ठेवण्यात आले आहे.
या नवीन पुलाचा दुसरा स्लॅब टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी शुक्रवारी रात्री जुन्या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, वाहतुकीला पर्याय म्हणून शहरातून पेठमाप फरशी हा मार्ग देण्यात आला आहे. यापूर्वीही कामानिमित्त पूल बंद ठेवण्यात आला होता.