खेडमध्ये भाजीपाला, फळविक्रेते एकाच रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:29 AM2021-05-17T04:29:59+5:302021-05-17T04:29:59+5:30
खेड : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मुख्य मार्ग अडवून फळे व भाजी व्यावसायिकांना शहरातील शंकर मंदिरासमोरील ...
खेड : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे
बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मुख्य मार्ग अडवून फळे व भाजी व्यावसायिकांना शहरातील शंकर मंदिरासमोरील मोकळ्या जागेत बसण्याची मुभा देण्यात आली आहे.
याठिकाणी ग्राहकांची खरेदीसाठी एकच झुंबड उडत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत होता. त्यामुळे नगर प्रशासनाने फळे व
भाजी व्यावसायिकांना एकाच रांगेत बसण्याबाबत सूचना केली आहे़ याठिकाणी पोलिसांची ज्यादा कुमकही तैनात करण्यात आली आहे. ग्राहकांची उसळणारी गर्दी लक्षात घेऊन भाजी व्यावसायिकांना एका रांगेत तर फळे विक्रेत्यांना दुसऱ्या बाजूकडील रांगेत बसण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या बाजूकडील मोकळ्या जागेत आंबा
व्यावसायिकांना बसण्याची मुभा देण्यात आली आहे, तर एका बाजूला पालेभाज्या विक्रेत्या महिलांना जागा निश्चित करण्यात
आली आहे. यावेळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना ध्वनिवर्धकाद्वारे सातत्याने
देण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन
करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तंबी देखील देण्यात येत आहे. यासाठी सकाळी ७ ते ११ यावेळेत पोलिसांची ज्यादा कुमक देखील तैनात करण्यात येत आहे.
-----------------------
खेड शहरात भाजीपाल्यासह फळविक्रेत्यांनी
एकाच रांगेत दुकाने थाटली आहेत.