वाहन चोरट्यास अटक-सात वाहने जप्त
By admin | Published: September 1, 2014 10:55 PM2014-09-01T22:55:22+5:302014-09-01T23:03:04+5:30
भंगारातील गाड्यांचे क्रमांक चोरींच्या गाड्यांना
रत्नागिरी : जुन्या गाड्या कमी दराने विकत घ्यायच्या. त्या भंगारात विकून त्यांचा नंबर व कागदपत्रे चोरलेल्या गाड्यांना मिळवून घ्यायची आणि चोरीच्या गाड्या राजरोसपणे रस्त्यावर आणायच्या, असा चोरट्यांचा नवा फंडा रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी आतिक खलिक मस्तान (वय २६, रा. साखरीनाटे, राजापूर) याला अटक केली असून, चोरलेल्या पाच सुमो गाड्या आणि सुमोचे एक इंजिन तसेच एक पल्सर, एक अॅक्टिव्हा असा त्यांच्याकडील २२ लाख ७० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
साखरी नाटे येथे राहणारा आतिक मस्तान हा वारंवार बाहेरून गाड्या आणत असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने नाटे येथे आतिक राहत असलेल्या गाझी मोहल्यात जाऊन त्याच्याकडील गाड्यांची खात्री केली असता गाडीवर असलेले नंबर, इंजिन नंबर, चेसीस नंबर व कागदपत्र यामध्ये तफावत असल्याचे दिसून आले. त्याबाबत सखोल तपास करता त्याच्याकडून भयानक सत्य
बाहेर आले. जुन्या गाड्या भंगारात विकून त्या गाड्यांचे नंबर्स व कागदपत्रांचा वापर चोरीच्या गाड्यांना वापरण्याची नवीन
पद्धत अवलंबिल्याची कबुली त्याने दिली.
आतिकने एमएच ०१ टी ७३९७ या क्रमांकाची सुमो गाडी भालावली येथून व एमएच ०३ एच ३४२६ या क्रमांकाची सुमो मुंबईहून खरेदी केली. या दोन्ही गाड्या त्याने भंगारात विकल्या.
यादरम्यान निपाणी-बेळगाव येथून एमएच १२ डीएम १०२८ व केए २२ बी ५०७३ या दोन सुमो
चोरून आणल्या होत्या. या चोरीच्या गाड्यांना त्यांना भंगारात विकलेल्या दोन सुमोंच्या नंबरप्लेट वापरल्या. तशी कागदपत्रेही त्याने करून घेतली. तसेच गाडी क्र. एमएच ०८ सी ८६४८ विकत घेऊन त्या गाडीचे इंजिन, (पान १ वरून) चेसी व
बॉडी हे इतर गाडी व्यावसायिकांना विकले आणि त्या गाडीची नंबरप्लेट व कागदपत्र हे चोरून आणलेल्या दुसऱ्या गाडीला वापरले.
आरोपींच्या घराशेजारी एका गाडीचे इंजिन व चेसी काढून ठेवलेली आढळली. (पान १० वर)