Video: दापोलीत पुन्हा एक बोट बुडाली; स्थानिक मच्छीमारांनी वाचवण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 09:17 AM2021-09-07T09:17:52+5:302021-09-07T09:19:23+5:30
आंजर्लेपाठोपाठ हर्णै येथे बोट बुडाली आहे.
दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी मंगळवारी सकाळी पुन्हा एक बोट भरकटून बुडाली. तालुक्यातील आंर्ले येथे सोमवारी एका बोटीला जलसमाधी मिळाली. तिला वाचवायला गेलेली बोट गाळात रुतली होती. सुदैवाने ती वाचली. आंजर्लेपाठोपाठ हर्णै येथे बोट बुडाली आहे. पाच सिलेंडरची ही बोट मंगळवारी सकाळी उधाणाच्या भरतीत वाऱ्यावर भरकटली. तिला वाचवण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण बोटीला जलसमाधी मिळली.
दापोली तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी मंगळवारी सकाळी पुन्हा एक बोट भरकटून बुडाली. pic.twitter.com/VrJ3iAIrEL
— Lokmat (@MiLOKMAT) September 7, 2021
दापोलीत ढगफुटी सदृश पावसानं रात्रभर धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या थैमानानं शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. दापोली शहरातील केळकर नाका शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात पुराचे पाणी चार ते पाच फूट वाढले अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने लोकांची धावपळ उडाली आहे. दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री एक वाजेपर्यंत शहरातला पूर कायम होता. एक नंतर पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे पाणी ओसरले आहे.
हवामान खात्याकडून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं पुन्हा आगमन झालं आहे. भारतीय हवामान खात्यानं पुढील चार ते पाच दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचे असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पालघर जिल्ह्यालाही अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मुंबई, ठाणे शहरांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.