अजगराला जाळून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे आले अंगाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:22 AM2021-06-24T04:22:02+5:302021-06-24T04:22:02+5:30

रत्नागिरी : कोंबडीला खाणाऱ्या अजगराला मारून त्याला अर्धवट जाळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना वनविभागाला ...

The video of the dragon being burnt went viral on social media | अजगराला जाळून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे आले अंगाशी

अजगराला जाळून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे आले अंगाशी

Next

रत्नागिरी : कोंबडीला खाणाऱ्या अजगराला मारून त्याला अर्धवट जाळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना वनविभागाला कळताच याप्रकरणी नाटे पडवणेवाडी येथील तिघांना वनविभागाने बुधवारी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

नाटे पडवणेवाडी (ता. राजापूर) येथील विजय पारकर (५३ वर्षे), वंदना पारकर (४४ वर्षे) आणि मानसी पारकर (२७ वर्षे) यांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अजगराला कोंबडीला खाताना पाहिले. त्यांनी या अजगराला लोखंडी कावरच्या साहाय्याने मारले. त्यानंतर नारळाच्या झावळाच्या साहाय्याने त्याला जाळले. या घटनेचा त्यांनी व्हिडीओही केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. अर्धवट जाळलेल्या या अजगराला आणि कोंबडीला जवळच्या ओढ्याजवळ नेऊन टाकले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओचा आधार घेत बुधवार, २३ रोजी रत्नागिरी परिक्षेत्राच्या वन अधिकारी प्रियंका लगड यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत नाटे पैकी पडवणेवाडी येथे जाऊन पाहणी करून घटनेचा शहानिशा केला. या आराेपींनी गुन्हा कबूल केला आहे. वनविभागाने अर्धवट जाळलेला अजगर ताब्यात घेऊन राजापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करून घेऊन त्याचे शव नष्ट करण्यात आले. या तीनही आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चालू आहे.

ही कार्यवाही मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर व्ही क्लेमेट बेन, विभागीय वन अधिकारी (चिपळूण) दीपक खाडे व सहायक वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी परिक्षेत्राच्या वन अधिकारी प्रियंका लगड, राजापूर वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सागर गोसावी, वनरक्षक सागर पताडे, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा संजय रणधीर यांनी कार्यवाही पार पाडली.

वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत अजगर किंवा वन्यजीवांची शिकार किंवा मारणे कायद्याने गुन्हा आहे. या कायद्याअंतर्गत ३ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा २५००० रुपये. दंड किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. त्यामुळे वन्यप्राणी मनुष्यवस्तीनजीक आल्यास किंवा संकटात सापडल्यास त्यासंबंधी वनविभागास तत्काळ कळविणेत यावे, असे आवाहन वनविभाग रत्नागिरी (चिपळूण) यांनी केले आहे.

Web Title: The video of the dragon being burnt went viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.