Video: दाभोळ खाडीत मच्छिमारी बोट बुडाली; ६ जण पोहत किनाऱ्यावर, २ जणांना थरारक पद्धतीने वाचवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 02:04 PM2020-08-09T14:04:53+5:302020-08-09T14:05:08+5:30
रविवारी सकाळी ही बोट मासेमारीसाठी समुद्रात जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
रत्नागिरी : गुहागरमधील अंजनवेलच्या लाईट हाऊससमोरील खोल समुद्रात रविवारी सकाळी मच्छिमारांची बोट बुडल्याची घटना घडली.
या बोटीवर एकूण ८ खलाशी होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. यातील ६ खलाशी जीवाच्या आकांताने पोहत पोहत किनारी आले तर उर्वरित दोघे काही काळ बुडणाऱ्या बोटीचा सहारा घेत राहिले. सुदैवाने आजूबाजूला ठराविक अंतरावर दुसरी एक बोट असल्यामुळे बुडणाऱ्या बोटीवरील इतर दोघांना वाचवण्यात यश आले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही,मात्र मच्छिमारांच्या बोटीला जलसमाधी मिळाली आहे.
रविवारी सकाळी ही बोट मासेमारीसाठी समुद्रात जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बोटीवरील खलाशी हे धोपावे गावातील रहिवासी असल्याचे कळतंय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुहागर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सुरक्षित आलेल्या मच्छिमारांना प्राथमिक उपचार देऊन त्यांची चौकशी सुरु आहे.
दाभोळ खाडीत मच्छिमारी बोट बुडाली; ६ जण पोहत किनाऱ्यावर, २ जणांना थरारक पद्धतीने वाचवलं pic.twitter.com/T6vkdLGtkS
— Lokmat (@MiLOKMAT) August 9, 2020