खातू मसालेच्या विजया खातू यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:14+5:302021-05-30T04:25:14+5:30
गुहागर : खातू मसाले उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शाळीग्राम खातू व हाॅटेल अन्नपूर्णाचे मालक शामकांत खातू यांच्या मातोश्री विजया शांताराम ...
गुहागर : खातू मसाले उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शाळीग्राम खातू व हाॅटेल अन्नपूर्णाचे मालक शामकांत खातू यांच्या मातोश्री विजया शांताराम खातू (८७) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे ४ वाजता निधन झाले.
तालुक्यातील पहिली भात, मसाला व विविध प्रकारच्या पिठाच्या गिरणींचा व्यवसाय शांताराम खातू यांनी नावारूपाला आणला. त्यांच्या या वाटचालीत पत्नी म्हणून विजया खातू यांनी सक्षमपणे हातभार लावला. शांताराम खातू यांच्या निधनानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली खातू मसाले व हाॅटेल अन्नपूर्णाच्या यशस्वी वाटचालीनंतर वटवृक्षात रूपांतर झाले. याच मातृप्रेमापोटी गेली अनेक वर्षे खातू मसालेच्या पॅकींगवर विजया खातू यांचे फोटो पहायला मिळतात. विजया खातू गेले ३ महिने आजारी होत्या. शुक्रवारी पहाटे ४ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुहागर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व चार मुली, नातवंडे असा परिवार आहे़