महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या लांजा संपर्क प्रमुखपदी विकास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:27+5:302021-06-23T04:21:27+5:30
लांजा : तालुक्यातील माचाळ गावचे सुपुत्र विकास महादेव पाटील यांची महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या लांजा तालुका संपर्क प्रमुखपदी निवड ...
लांजा : तालुक्यातील माचाळ गावचे सुपुत्र विकास महादेव पाटील यांची महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या लांजा तालुका संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. माजी भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य परशुराम पाटील यांच्याहस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील सद्य:स्थिती पाहता मराठी भाषेचे संरक्षण करणे, तसेच मराठी लोकांच्या हक्कासाठी लोकचळवळ उभारणे आवश्यक आहे. महाराष्ट्र संरक्षण संघटना संलग्न मी मराठी एकीकरण समिती मराठी भाषा, जतन संवर्धन, संरक्षण आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी गेली अनेक वर्ष काम करीत आहे आणि या संघटनेची जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन, असे आश्वासन विकास पाटील यांनी नियुक्तीनंतर दिले आहे.
नियुक्तीवेळी महाराष्ट्र राज्याचे माजी भाषा संचालक परशुराम पाटील, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मनोहर साळवी, पश्चिम मुंबई उपनगरातील समाजसेवक विलोभ पाटणकर, स्वप्निल नाईक, धर्मेंद्र घाग, कोषाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष शैलेश आंब्रे, संजय संख्ये, उपनगर तालुकाध्यक्ष श्रीकांत अदाते, अमोल रणदिवे, चेतन वेसविकर, चेतन कोलगे, गणेश नाकोड, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अजित गोरुले उपस्थित होते.
-----------------------
महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या लांजा तालुका संपर्क प्रमुखपदी विकास पाटील यांना परशराम पाटील यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले़