शिवसेना पडवे गटातर्फे विक्रांत जाधव यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:29 AM2021-03-28T04:29:35+5:302021-03-28T04:29:35+5:30

आबलोली : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पडवे गट शिवसेनेतर्फे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांचा सत्कार करण्यात ...

Vikrant Jadhav felicitated by Shiv Sena Padve group | शिवसेना पडवे गटातर्फे विक्रांत जाधव यांचा सत्कार

शिवसेना पडवे गटातर्फे विक्रांत जाधव यांचा सत्कार

Next

आबलोली : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पडवे गट शिवसेनेतर्फे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

शाहीर सचिन पवार यांनी पोवड्यातून अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव केला. त्यानंतर जिल्हा परिषद पडवे गटाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी परिसरातील अनेक सरपंच, वाडीप्रमुख, विविध संघटना यांनीही त्यांचा सत्कार केला.

तालुकाप्रमुख सचिन बाईत, जिल्हा परिषदेचे सदस्य महेश नाटेकर, पंचायत समिती सभापती पूर्वी निमुणकर, विनायक मुळ्ये, गुहागर युवासेना तालुकाध्यक्ष अमरदीप परचुरे, चिपळूण युवासेना तालुकाध्यक्ष उमेश खताते, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र आंबेकर, सीताराम ठोंबरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रदीप सुर्वे, युवासेना उपजिल्हा अधिकारी सचिन जाधव, जामसूत सरपंच बाबू सावंत, शरद साळवी, बाबा वैद्य, के. बी. उकार्डे, विभागप्रमुख नरेश निमुणकर, आबलोली शाखाप्रमुख संदीप निमुणकर, महिला आघाडी वनिता डिंगणकर, पूजा कारेकर यांसह विभागातील सर्व शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासैनिक, शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.

अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. एकाच टर्ममध्ये विरोधी पक्षनेता ते अध्यक्ष अशी दोन्ही पदे सांभाळण्याचा, गुहागर तालुक्यातून पहिल्यांदाच अध्यक्ष होण्याचा व कमी वयात अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला असून, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे ते म्हणाले. नरेश निमुणकर यांनी सूत्रसंचालन केले.

..............

फोटो आहे.

Web Title: Vikrant Jadhav felicitated by Shiv Sena Padve group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.