वाटूळमध्ये गावठी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:40+5:302021-04-08T04:31:40+5:30
राजापूर : तालुक्यातील वाटूळ येथे ३०० लिटर गावठी दारूची वाहतूक करणारी कार जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क ...
राजापूर : तालुक्यातील वाटूळ येथे ३०० लिटर गावठी दारूची वाहतूक करणारी कार जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या लांजा येथील पथकाने ही धाड टाकली. रत्नागिरीच्या मिरजोळे येथील शुभर नरेंद्र पाटील या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर गावठी दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर राज्य उत्पादन शुल्कच्या लांजा कार्यालयाच्या उपनिरीक्षक अमित पाडाळकर यांनी वाटूळ येथे सापळा रचला. त्यात गावठी दारूची वाहतूक करणारी एक लाल रंगाची मारुती अल्टो कार त्यांच्या ताब्यात आली. या कारवाईत ३०० लिटर गावठी दारू व वाहनासह १ लाख २ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक शुभम नरेंद्र पाटील (२६, रा. मिरजोळे, रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक शरद जाधव, सुरेश पाटील, उपनिरीक्षक अमित पाडाळकर, भागवत, किरण पाटील, निखिल पाटील, जवान विशाल विचारे, अतुल वसावे, सावळाराम वड, ओंकार कांबळे, संदीप विटेकर, अनिता नागरगोजे यांनी केली. कोरोना काळात जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत अवैध गावठी दारूची वाहतूक व विक्री होऊ नये म्हणून करडी नजर ठेवणार असल्याचे उपअधीक्षक वैद्य यांनी सांगितले.