liquor ban-मिरजोळे येथे गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 05:17 PM2021-05-20T17:17:49+5:302021-05-20T17:20:09+5:30
liquor ban Crimenews Ratnagiri : रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी छापा टाकून दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. भरारी पथक, चिपळूण, खेड, लांजा, रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण कार्यालयाने संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी छापा टाकून दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. भरारी पथक, चिपळूण, खेड, लांजा, रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण कार्यालयाने संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच पथकांनी एकत्र येत केलेल्या या कारवाईत पथकाच्या हाती दारूअड्डा चालविणारा कोणीच लागला नाही.
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे हातभट्टी निर्मुलन कार्यक्रमांतर्गत आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी ही धडक कारवाई केली.
मिरजोळे (ता. रत्नागिरी) हातभट्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी गावठी दारू व रसायन असा एकूण ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याठिकाणी दारूनिर्मितीसाठी लागणारे जवळपास ४,३०० लीटर रसायन आढळले.
कोरोनो विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत अवैध गावठी दारूची वाहतूक विक्री होऊ नये म्हणून करडी नजर ठेवणार असल्याचे प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी सांगितले.