मिरजाेळे येथे गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:10+5:302021-05-21T04:32:10+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील मिरजाेळे येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सकाळी धाड टाकत दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला़ ...
रत्नागिरी : तालुक्यातील मिरजाेळे येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सकाळी धाड टाकत दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला़ भरारी पथक चिपळूण, खेड, लांजा, रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण कार्यालयाने संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ जिल्ह्यातील सर्वच पथकांनी एकत्र येत केलेल्या या कारवाईत पथकाच्या हाती दारूअड्डा चालविणारा काेणीच लागला नाही़
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे हातभट्टी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आयुक्त कांतिलाल उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय उपआयुक्त वाय. एम़ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधीक्षक व्ही़ व्ही़ वैद्य यांनी ही धडक कारवाई केली़ मिरजाेळे (ता़ रत्नागिरी) येथे हातभट्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली़ त्यानुसार पथकाने धाड टाकून ही कारवाई केली़ यावेळी गावठी दारू व रसायन असा एकूण ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या ठिकाणी दारूनिर्मितीसाठी लागणारे जवळपास ४,३०० लीटर रसायन आढळले़
काेराेनाे विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन कालावधीत अवैध गावठी दारूची वाहतूक, विक्री हाेऊ नये म्हणून करडी नजर ठेवणार असल्याचे प्रभारी अधीक्षक व्ही़ व्ही. वैद्य यांनी सांगितले़
------------------------
रत्नागिरी तालुक्यातील मिरजाेळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला़