खेड तालुक्यात ग्राम ‘निर्मल’ होईना!

By admin | Published: November 20, 2014 10:49 PM2014-11-20T22:49:19+5:302014-11-21T00:38:41+5:30

दोनच तालुके निर्मल : काटेकोर अंमलबजावणीची आवश्यकता

Village 'Nirmal' in Khed taluka! | खेड तालुक्यात ग्राम ‘निर्मल’ होईना!

खेड तालुक्यात ग्राम ‘निर्मल’ होईना!

Next

श्रीकांत चाळके -खेड -जिल्हाभरात अनेक ग्रामपंचायती निर्मल झाल्या असल्या तरी खेडमध्ये १८ ग्रामपंचापयती शौचालयाविना आहेत. जिल्ह्यात केवळ दोन तालुके निर्मल असून, उर्वरित तालुक्यांतील अनेक गावे निर्मल होण्यापासून वंचित आहेत.
‘स्वच्छ ग्राम निर्मल ग्राम’ हे घोषवाक्य घेऊन राज्य सरकारने ही योजना सुरू केली़ मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना अनेकांनी राजकीय तसेच स्वत:च्या हिताकडेच जास्त पाहिले़ खेड तालुक्यात १८ ग्रामपंचायतींना अद्याप शौचालये नाहीत, ही स्थिती गंभीर नसली तरीही राजकीय स्वार्थापोटी हा आकडा तसाच राहणार असल्याने या योजनेची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.
उघड्या जागेवर शौचास बसणे हे कोणत्याही रोगराईस आमंत्रण देण्यासारखे आहे़
याबाबत अनेकांनी अनेक ठिकाणी जनजागृतीही केली. मात्र, याविषयी किती नागरिक जागरूक झाले, हाच संशोधनाचा विषय बनून राहीला आहे. ग्रामीण भागातील हे चित्र बदलण्यासाठी राज्य सरकारने ही योजना अमलात आणली. ग्रामीण भागात उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण मोठे आहे. याचा विचार करून सरकारने या योजनेस मूर्त स्वरूप दिले. साधारणपणे ६ ते ७ वर्षांपूर्वी ही स्थिती गंभीर होती़
आज यामध्ये काही प्रमाणात बदल झाला. मात्र, याचे प्रमाण नगण्य आहे. सरकारी योजनेचा अनेकांनी लाभ घेतला असला तरीही वैयक्तिक शौचालयांची आकडेवारी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे़ जिल्ह्यात २० टक्के कुटुंब आजही शौचालयाविना आहेत. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रूपयांचे अनुदान, तर निर्मल ग्राम योजनेतून १० हजार रूपये अनुदान देण्यात येते.
जिल्ह्यात गुहागर आणि लांजा हे दोन तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही तालुके निर्मल झाले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेने २०२२पर्यंत निर्मल भारत अभियानाअंतर्गत ही शौचालये बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे़ याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून या शौचालयाकरिता प्रस्ताव मागविले असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींकडून यासाठी पाठपुरावा आवश्यक असल्याचा सूर आळविला जात आहे़

जिल्ह्याची स्थिती
जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायती आजही शौचालयाविना आहेत़ तीन लाख ६४ हजार ९८० कुटुंबांकडे आजही शौचालये नाहीत. हा आकडा काहीसा कमी झाला असला तरी हे प्रमाण नगण्य आहे़
शौचालयाविना असलेली दारिद्र्यरेखेखालील आणि रेषेवरील कुटुंबांची यादीही हजारोंच्या घरात आहे.

शौचालयांविना ग्रामपंचायती
अद्याप जिल्हाभरात ८८ ग्रामपंचायती शौचालयाविना आहेत. या गावात शौचालय बाधणी कधी होणार व गावात शौचालयांची गरज तातडीने पूर्ण केली जाणार का? हा प्रश्न आहे.

Web Title: Village 'Nirmal' in Khed taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.