गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारावे : अविनाश लाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:39 AM2021-04-30T04:39:47+5:302021-04-30T04:39:47+5:30
राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारावे व जिथे क्वारंटाईन सेंटर आहेत तिथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करावा, ...
राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारावे व जिथे क्वारंटाईन सेंटर आहेत तिथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करावा, अशा आशयाचे पत्र नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व राजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेते अविनाश लाड यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून उपयोगात आणल्यास रुग्णसंख्या कमी करता येऊ शकते व रुग्ण गावातच राहिल्याने घरचा जेवणाचा डबा, घरचेच बेड असल्याने कमी खर्चात जास्त रुग्ण बरे होतील, अशी उपाययोजना करणे काळाची गरज आहे. गावातील प्रतिष्ठित लोकांनी हे मनावर घेतल्यास सहजशक्य आहे. गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत शिपाई यांना शासकीय आदेश देऊन त्यांना जबाबदारी देण्यात यावी. असे केल्यास ग्रामीण भागातील परिस्थितीत लवकर सुधारणा होईल. तसेच जिथे क्वारंटाईन सेंटर आहेत तिथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करावा. जेणेकरून मृत्यूचा दर कमी होईल, अशा आशयाचे पत्र काॅंग्रेस नेते अविनाश लाड यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे. तसेच सदरचे पत्र रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनाही सादर केले आहे.