चोरवणेतील ग्रामस्थांची वणवण थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:04+5:302021-05-08T04:33:04+5:30

दापोलीत कोरोना योद्ध्यांचा सन्मान दापोली : लढवय्या महाराष्ट्र या संस्थेतर्फे दापोलीत काही कोविड योद्ध्यांचा पोलीस उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड ...

The villagers stopped crying | चोरवणेतील ग्रामस्थांची वणवण थांबली

चोरवणेतील ग्रामस्थांची वणवण थांबली

Next

दापोलीत कोरोना योद्ध्यांचा सन्मान

दापोली : लढवय्या महाराष्ट्र या संस्थेतर्फे दापोलीत काही कोविड योद्ध्यांचा पोलीस उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये फैसल काझी, अर्थव सोमण, आनंदकुमार पिल्ले, रुग्णवाहिका चालक साहिल पोवार, परेश मेहेंदळे या सर्वांना कोविड योद्ध्यांचा सन्मान दापोली पोलीस ठाणे येथे प्रदान करण्यात आला.

तिसंगी - धनगरवाडीलाही टँकरने पाणीपुरवठा

खेड : तालुक्यात सद्य:स्थितीत १२ गावे २२ वाड्यांना एक शासकीय व तीन खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकीकडे टंचाईग्रस्त गाव -वाड्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे टँकरची कमतरता भासत आहे. यामुळे टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे.

केळणेतील दोन वाड्यांत पाण्याचे दुर्भिक्ष

खेड : तालुक्यात १० गावे १९ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसलेली असतानाच केळणे येथील भोसलेवाडी, मांगलेवाडी या दोन वाड्यांनाही मंगळवारपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. सद्य:स्थितीत ११ गावे २१ गाड्यांना एक शासकीय व तीन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पथकांद्वारे सर्वेक्षण सुरू

दापोली : 'माझी रत्नागिरी - माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत शहरात नगर पंचायतीकडून १४ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये दोन शिक्षक, चार ते पाच स्वयंसेवक आहेत. हे पथक प्रत्येक घरी जाऊन नागरिकांची ऑक्सिमीटर, थर्मामीटरने तपासणी व आरोग्याविषयी चौकशी करीत आहे. यावेळी संशयास्पद रुग्ण आढळल्यास तपासणी करून घेण्याबाबत सूचित करण्यात येणार आहे.

Web Title: The villagers stopped crying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.