नवनिर्माण हायमध्ये ‘व्हर्च्युअल बेबी शो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:39 AM2021-04-30T04:39:27+5:302021-04-30T04:39:27+5:30
रत्नागिरी : कोविड महामारी आणि लॉकडाऊनमध्ये गेले वर्षभर सहा वर्षांखालील बालके शिक्षण आणि शालेय संस्कारापासून वंचित झाली आहेत. ...
रत्नागिरी : कोविड महामारी आणि लॉकडाऊनमध्ये गेले वर्षभर सहा वर्षांखालील बालके शिक्षण आणि शालेय संस्कारापासून वंचित झाली आहेत. जणू त्यांच्याकडे या वर्षभराच्या कालावधीत दुर्लक्षच झाले आहे. या बालकांना ते वर्ष तर परत मिळवून देणे अशक्य, मात्र येणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षासाठी या बालकांसाठी त्यांच्यासोबत विविध खेळ खेळत त्यांना विविध स्किल्सना जाणीव जागृती देणारा, त्यांच्या उत्कंठा आणि कल्पकता विस्तारित करणारा आणि आनंदमय शिक्षण देणारा खास डिजिटल प्लॅटफार्म नवनिर्माण हायने सुरू केला आहे. त्यासाठी रत्नागिरी परिसरातील मुलांसाठी थेट मोफत प्रवेश सुविधा आहे.
नवनिर्माण हायच्या “व्हर्च्युअल बेबी शो”मधून पालक आणि त्यांची दोन ते पाच वर्षांच्या आतील बालके त्यात सहभागी होऊ शकतील. या शो मध्ये सीबीएससी अभ्याक्रमाचे विशेष तज्ज्ञ नवनिर्माण हायचे सीएफओ प्रा. आलोक मिश्रा (नवी दिल्ली) सुपर बेबी, प्रीटी एन्जल, हॅन्डसम हंक, सनीएस्ट स्माईल, मोस्ट अवेअर पेरेंट आदी विविध विभाग असून, या खास बालकांसाठीच्या डिजिटल प्लॅटफाॅर्मची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार आहेत. लिसनिंग स्किल, थिंकिंग स्किल, स्पिकिंग स्किल, कॉम्प्रेहेन्सीव स्किल आदी विविध सुप्तावस्थेत असणारी कौशल्य विकसित करणे आणि त्यासाठी विविध छोट्या छोट्या रोजच्या जगातील सभोवतालच्या पर्यावरणाचा वापर करणे आणि त्यातून मुलांना शिक्षणाची ओळख देणे, यात कधी प्राण्यांच्या आवाजाची ओळख, तर चित्र, रंग, आकृत्या, वस्तू, ॲक्शन, स्मरण शक्तीचे खेळ, टंग ट्विस्टर, करेक्ट मी, या माध्यमातून हा अभ्यासक्रम थेट मुलांपर्यंत पोहोचेल आणि बालके या नव्या ज्ञानाच्या आणि कौशल्य वृद्धीच्या बालजगात समरसून जातील, अशी त्याची रचना आहे. यामुळे बालकांचा घराबाहेरचा शालेय प्रवास सुरू होणार आहे, तो थेट शाळाच त्यांच्या घरात प्रवेश करून.
रत्नागिरी शहर आणि तालुका परिसरातील सर्व पालकांसाठी 'व्हर्च्युअल बेबी शो' संकल्पना राबविण्यात येत आहे. या नव्या अभ्यासक्रमातील प्रवेश मोफत असून क्षमता मर्यादित आहे. यात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बालक पालकांसाठी काही ऑनलाईन मॉडेल क्लासचे आयोजन केले आहे. या माध्यमातून पहिल्या मोफत प्रवेशांच्या जागा आरक्षित होतील. “व्हर्च्युअल बेबी शो” उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि नवनिर्माण किंडरगार्टन मधील प्रवेश मोफत नोंदविण्यासाठी https://forms.gle/vmcTGUtWtdmWnGVE9 या नवनिर्माण गुगल लिंकवर संपर्क करावा.