चिपळूणमध्ये आज व्हर्च्युअल संत समागम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:36 AM2021-08-18T04:36:59+5:302021-08-18T04:36:59+5:30

चिपळूण : कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, खरसई, वाडसासह चिपळूण या सात विभागांसाठी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ९.३० ...

Virtual saint intercourse today in Chiplun | चिपळूणमध्ये आज व्हर्च्युअल संत समागम

चिपळूणमध्ये आज व्हर्च्युअल संत समागम

Next

चिपळूण : कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, खरसई, वाडसासह चिपळूण या सात विभागांसाठी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ९.३० यावेळेत विशाल व्हर्च्युअल संत निरंकार समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चिपळूण विभागामधील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४,००० पेक्षा जास्त भक्त सहभागी होणार आहेत. त्याची जय्यत तयारी चिपळूण येथे सुरू आहे.

कोरोनाच्या महामारीत माणूस इच्छा असूनही एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही. असे असताना कोविड १९ संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करून व्हर्च्युअल संत समागमाच्या माध्यमातून सद्गुरू माता सुदीक्षा महाराज देश - विदेशातील भक्तांना दर्शन देऊन भक्तिचा उत्साह वाढवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात स्वरूप गीत, विचार, लघु कवी दरबार व शेवटी सद्गुरू माताजींचे विचार मांडले जाणार आहेत.

या कार्यक्रमाचा लाभ भाविकांना संत निरंकारी मिशनच्या अधिकृत वेबसाईटवर घेता येईल. गेले २० दिवस चिपळूणच्या पूरग्रस्त भागात अनेक समाजसेवी उपक्रम राबवून निरंकारी मिशनने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. या समाजसेवी उपक्रमाबरोबरच अध्यात्मिकता जागृत ठेवण्याचे काम अशा व्हर्च्युअल संत समागमाच्या माध्यमातून सद्गुरू माताजी करीत आहेत. या व्हर्च्युअल संत समागमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन क्षेत्रीय प्रबंधक गंगाधर विचारे आणि प्रकाश म्हात्रे (क्षेत्रीय प्रबंधक खरसई ४० अ) यांनी केले आहे.

Web Title: Virtual saint intercourse today in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.