तिवरेमध्ये घडतंय माणुसकीचे दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 10:24 PM2019-07-05T22:24:03+5:302019-07-05T22:24:17+5:30

४७ आपद्ग्रस्त सध्या तिवरे हायस्कूलमध्ये राहत असून, त्यांच्यासाठी मदतीचा हात घेऊन येणाऱ्या असंख्य संस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. 

Visions of humanity occurring in the cottage | तिवरेमध्ये घडतंय माणुसकीचे दर्शन 

तिवरेमध्ये घडतंय माणुसकीचे दर्शन 

Next

चिपळूण : तालुक्यातील तिवरे येथे धरण फुटीची दुर्घटना घडल्यानंतर वाचलेले व घरांचे नुकसान झालेले ४७ आपद्ग्रस्त सध्या तिवरे हायस्कूलमध्ये राहत असून, त्यांच्यासाठी मदतीचा हात घेऊन येणाऱ्या असंख्य संस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. 
चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण मंगळवारी २ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता फुटले. या दुर्घटनेमध्ये २४ जण बेपत्ता झाले होते.   त्यापैकी २० मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन घरातील भांडी, चूल, सिलेंडर, शेगड्या, सर्व सामान वाहून गेले आहे. गेले तीन दिवस तेथील लोकांची चूल पेटलेली नव्हती. काही सामाजिक संस्थांनी मदत व रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या सर्वांची जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच घटना घडल्यापासून तिवरे येथील पोषण आहाराची जेवण करणारी स्थानिक महिला हर्षदा हरिश्चंद्र शिंदे व विश्वास रामजीराव शिंदे या दोघांनी जेवणाची व्यवस्था केली होती. काही संस्थांनी व लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

यामध्ये समृध्द कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिध्देश जाधव यांनी ४० टॉवेल, २४ साबण, २४ कोलगेट व काही नऊवारी साड्या, सिध्देश लाड मित्रमंडळ यांच्याकडून टॉवेल, ५० किलो तांदूळ, १० किलो साखर, १० लीटर तेल, रामशेठ रेडीज यांच्याकडून तांदूळ, ४ बिस्कीटचे बॉक्स, तहसीलदार कार्यालयाकडून २८ ब्लॅकेट, स्वामी बाळ सत्यधारी महाराज सेवा केंद्र शिळ-खेडशी, अमित गॅस एजन्सीकडून ३ सिलेंडर, २ शेगड्या, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, जयंत साडी सेंटर यांच्याकडून १५ साड्या, मुलांना कपडे, नवशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रितम देवळेकर या गेल्या तीन दिवसापासून मदतीचे कार्य करीत आहेत. त्यांनी जेवण, पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांची ७ ते ८ जणांची टिम या ठिकाणी कार्यरत आहे. तिवरे भेंदवाडी या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेतील तुकाराम शंकर कनावजे, सखाराम धोंडू तांबट, जानकी तुकाराम कदम, अजित अनंत चव्हाण, नारायण रघुनाथ गायकवाड, कृष्णा बाळू कातुर्डे, चंद्रभागा कृष्णा कातुर्डे यांची व्यवस्था तिवरे न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळेत करण्यात आली आहे. त्या शाळेतील शिक्षक श्रीधर रघुनाथ जोशी हे देखील सहकार्य करीत आहेत.

Web Title: Visions of humanity occurring in the cottage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.