अध्यक्षपदी विठोबा साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:56+5:302021-09-25T04:33:56+5:30

खेड : तालुक्यातील घेरा पालगड गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शाहीर विठोबा साळवी यांची निवड बिनविरोध करण्यात आली ...

Vithoba Salvi as the President | अध्यक्षपदी विठोबा साळवी

अध्यक्षपदी विठोबा साळवी

Next

खेड : तालुक्यातील घेरा पालगड गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शाहीर विठोबा साळवी यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. सरपंच सायली चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच काशिनाथ शिंदे तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.

भातशेतीचे नुकसान

मंडणगड : पितृ पंधरवड्याच्या पहिल्या दोन दिवसात संततधार पडलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याने वार्षिक सरासरी आधीच पूर्ण झाली आहे. सततच्या या पावसाने भातशेती पाण्यात गेली असून बळीराजाला नुकसानाचा फटका बसला आहे.

शैक्षणिक साहित्य वाटप

गुहागर : तालुक्यातील धोपावे येथे स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान यांच्यावतीने २२ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी धोपावे ग्रामविकास मंडळाने सहकार्य केले. आरेकर प्रतिष्ठानतर्फे यावर्षी तालुक्यात कोविड पालक अभियान राबविण्यात येत असून २०० गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

खड्डे बुजविण्याची मागणी

दापोली : येथील बसस्थानकात पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच हे दोन मोठे खड्डे असल्याने एसटी आत येताना व बाहेर जाताना या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांना होतोय. काही दिवसांपूर्वी या खड्ड्यात एक महिला पडून जखमी झाली त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

शाळेला देणगी

लांजा : तालुक्यातील गवाणे गावचे सुपुत्र सध्या मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेले कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका लांजाचे सहसचिव चंद्रकांत करंबेळे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयातील वकील जितेंद्र मिश्रा यांच्याकडून वनगुळे शाळा क्रमांला २ ला कॉम्प्युटर प्रिंटरची देणगी देण्यात आली. मुख्याध्यापिका अनघा हर्डीकर यांनी या देणगीबद्दल आभार मानले.

Web Title: Vithoba Salvi as the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.