पणदेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला उद्घाटनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:55 PM2017-08-14T17:55:22+5:302017-08-14T17:55:26+5:30
मंडणगड : शासनाने लाखो रुपये खर्च करून, ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्यविषयक चांगल्या सुविधा मिळाव्या, यासाठी लाखो रूपयांचा निधी खर्च करून, पणदेरी (ता.मंडणगड) येथे आरोग्य केंद्राची इमारत बांधली आहे. मात्र, या इमारतीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने, मागील चार वषार्पासून इमारत पूर्ण होऊनही त्या इमारतीचे उद्घाटन झाले नाही. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाण्याची चिन्हे आहेत. ही इमारतसुध्दा मंडणगड येथे बांधण्यात आलेल्या ग्रामिण रूग्णालयाच्या पंगतीत जाणार का? असा प्रश्न समोर येत आहे.

मंडणगडातील आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर तसेच नर्स यांची नेहमीच चणचण आहे. त्याकडेही आरोग्य खाते लक्ष देत नाही. पणदेरी येथे गेल्या अनेक वषार्पासून डॉक्टरांची जागा रिक्त आहे. कदाचीत त्यामुळे आरोग्य विभाग डॉक्टर नसल्याने सदर इमारतीच्या उद्घाटनाकडे दुर्लक्ष करीत असावे, अशी भीती आहे.
पणदेरी हे खेडेगाव मंडणगड पासून सुमारे वीस किमी अंतरावर आहे. या ठिकाणी लाखो रुपये खर्च केलेले आहेत. आता या ठिकाणचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जर स्थानिक प्रशासनाने किंवा लोकप्रतिनीधींनी लक्ष दिले असते, तर कदाचीत या चार वर्षात रस्त्याचा मार्ग मोकळा झाला असता.