प्राथमिक शिक्षकाच्या उपक्रमशीलतेने मिळाली वॉटर डिस्पेंसर मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:30 AM2021-05-14T04:30:37+5:302021-05-14T04:30:37+5:30
मंडणगड : तालुक्यातील दहागाव येथील उपक्रमशील शिक्षक संदीप जालगांवकर यांनी ‘एक हात मदतीचा’ या शीर्षकाखाली राबविलेल्या मोहिमेच्या माध्यमातून जमा ...
मंडणगड : तालुक्यातील दहागाव येथील उपक्रमशील शिक्षक संदीप जालगांवकर यांनी ‘एक हात मदतीचा’ या शीर्षकाखाली राबविलेल्या मोहिमेच्या माध्यमातून जमा झालेल्या देणगीतून मंडणगड तालुक्यातील कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरातील कोविड केअर सेंटरला वॉटर डिस्पेंसर मशीन देणगी रुपाने देण्यात आली.
संदीप जालगांवकर यांच्या आव्हानाला साद देत मंडणगड व दापोली तालुक्यातील शिक्षक मित्र अस्लम जुवले, सुनील आईनकर, अरुण गणवे, जगदीश जालगावकर, श्रीराम महाडिक, सारिका भगत, संजय करावडे, सुदेश पालशेतकर, समीर पाडलेकर, संतोष दुधाने, सत्यप्रेम घुगे यांनी देणगी दिली़ त्यातून ही मशीन देण्यात आली़
एक हात मदतीच्या उपक्रमाला दापोली, मंडणगडमधील शिक्षकांनी सहज तत्काळ मदत करून आपण सामाजिक बांधिलकी जपली़ सध्याच्या कोविड महामारीच्या साथीत आपले उत्तरदायित्व म्हणून खारीचा वाटा उचलला़ वॉटर डिस्पेन्सरमुळे रुग्णांची गरम पाणी पिण्याची व्यवस्था झाली आहे. शिवाय त्यांना २४ तास गरम पाणी करून देण्याचा त्रास ही तेथील कर्मचाऱ्यांचा वाचला आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भावठणकर, डॉ. भगवान पितळे, अस्लम जुवले, सुनील आईनकर, संजय करावडे उपस्थित होते.
------------------------------
मंडणगड येथील कोविड सेंटरला संदीप जालगावर व शिक्षक मित्र यांच्याहस्ते वॉटर डिस्पेंसर देण्यात आले़ यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भावठणकर उपस्थित हाेते़