आवाशी गणेशनगर परिसरातील घरांमध्ये पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:37 AM2021-09-08T04:37:51+5:302021-09-08T04:37:51+5:30

आवाशी : मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे खेड तालुक्यातील आवाशी गावातील गणेशनगर परिसर जलमय झाले होते. एखाद्दुसरे कुटुंब वगळता संपूर्ण वस्ती ...

Water in the houses in Awashi Ganeshnagar area | आवाशी गणेशनगर परिसरातील घरांमध्ये पाणीच पाणी

आवाशी गणेशनगर परिसरातील घरांमध्ये पाणीच पाणी

Next

आवाशी : मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे खेड तालुक्यातील आवाशी गावातील गणेशनगर परिसर जलमय झाले होते. एखाद्दुसरे कुटुंब वगळता संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली होती.

मुंबई - गोवा महामार्गालगत असणाऱ्या आवाशी गावातील गणेशनगर वसाहत पावसामुळे जलमय झाली हाेती. साेमवारी (दि. ६) रात्री ९.३० नंतर या वस्तीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. बघता-बघता पाणी सर्वांच्या घरात शिरले आणि हाहाकार उडाला. मोजकीच दोन-तीन घरे वगळता सर्वच घरांत पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांचे कपडे, अन्नधान्य व जमिनीवरील वस्तू पाण्याखाली गेल्या. मध्यरात्री दाेन वाजण्याच्या दरम्यान पावसाचे पाणी ओसरू लागले. त्यानंतर ग्रामस्थांनी निःश्वास सोडला. मंगळवारी सकाळी आवाशीचे सरपंच ॲड. राज आंब्रे, उपसरपंच अमित आंब्रे व त्यांचे सहकारी तसेच ग्रामसेवक, तलाठी यांनी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे सरपंच यांनी सांगितले.

दरम्यान, महामार्गाचे सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम, त्यामुळे बुजले गेलेले नाले, तसेच आवाशी ते लवेलपर्यंत सुरू असलेले विस्तारित एमआयडीसीचे काम, त्यांनी वळविलेले पाण्याचे प्रवाह यामुळे लोकवस्तीत पाणी शिरल्याचा प्राथमिक अंदाज सरपंच राज आंब्रे यांनी व्यक्त केला.

Web Title: Water in the houses in Awashi Ganeshnagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.