खोपी रामजीवाडीलाही टँकरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:23+5:302021-04-16T04:31:23+5:30
अखिल वैश्यवाणी समाज महासंघ अध्यक्षपदी राजेंद्र लकेश्री खेड : अखिल वैश्यवाणी समाज महासंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र लकेश्री यांची निवड करण्यात ...
अखिल वैश्यवाणी समाज महासंघ अध्यक्षपदी राजेंद्र लकेश्री
खेड : अखिल वैश्यवाणी समाज महासंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र लकेश्री यांची निवड करण्यात आली आहे. समाजबांधवांच्या बैठकीत सरचिटणीसपदी विनायक हेगिष्टे, कार्याध्यक्षपदी प्रभाकर शेट्ये, उपाध्यक्षपदी गुरुनाथ बेर्डे, संदीप तानवडे, चिटणीसपदी दत्ताराम वंजारे, लहू नर, खजिनदारपदी सुभाष खाडविलकर, तर हिशेब तपासणीसपदी कृष्णा गंधे यांची निवड करण्यात आली आहे.
खेड राष्ट्रवादीतर्फे आज रक्तदान शिबिर
खेड : कोरोनाच्या संकटामुळे रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने सरकारने केलेल्या आवाहनानुसार तालुका व शहर युवक राष्ट्रवादीतर्फे १६ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत द. ग. तटकरे सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन प्राध्यापक प्रशिक्षण
खेड : तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल शाखेतर्फे आयोजित १ आठवड्याचे राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन दि्वतीय प्राध्यापक प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कर्नल बी. व्यंकट, आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. देसाई यांच्याहस्ते पार पडले. शिबिरात ५० हून अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.
पोलिसांच्या मदतीला गृहरक्षक दल
खेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू झाली असून, येथील पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यांच्या मदतीला आता तालुका गृहरक्षक दल आपत्ती व्यवस्थापनही पुढे सरसावले आहे. या आपत्ती व्यवस्थापनाकडून चोख व्यवस्था बजावण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये १५ हून अधिक गृहरक्षक दलाच्या जवानांचा समावेश आहे.
रिलिफ फाैंडेशनचा मदतीचा हात
खेड : कोरोना लॉकडाऊन कालावधीत हातावर पोट असणाऱ्या गरजू कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी रिलिफ फौंडेशन पुढे सरसावले आहे. शहरासह तालुक्यातील १५० कुटुंबीयांना महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार असून, या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. रिलिफ फाैंडेशनच्या या मदतीने गरजू कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.