कोयना धरणातून गुरुवारी पाण्याचा विसर्ग वाढवणार, सिंचन विभागाने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 08:30 PM2023-07-26T20:30:24+5:302023-07-26T20:30:31+5:30
निलेश साळुंखे,कोयनानगर: कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून गुरूवार दि 27 जुलै रोजी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असून कोयना नदीपात्रात एकुण 2100 ...
निलेश साळुंखे,कोयनानगर:कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून गुरूवार दि 27 जुलै रोजी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असून कोयना नदीपात्रात एकुण 2100 क्युसेक्स विसर्ग होणार असल्याची माहिती कोयना सिचन विभागाने दिली आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने धरणाच्या पायथावीजगृहाचे दुसरे जनित्र संच गुरूवारी दुपारी चार वाजता सुरू करण्यात येणार आहे. यामधून 1050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग व याअगोदर सोमवार दि 24 जुलै रोजी धरणाचे एक जनित्र संचातून वीजनिर्मिती करून 1050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला होता.
यामधे वाढ होणार असलेनं एकुण 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पायथावीजगृहातुन कोयना नदीपात्रात सुरू होणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आला आहे. बुधावारी सायं पाच वाजता कोयना धरण 59.29% भरले असुन पाणीपातळी 2121.04 फुट इतकी झाली आहे तर धरणाचा पाणीसाठा 62.41 टीएमसी वर पोहचला आहे.धरणात 42669 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.