जलसुरक्षा कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:33 AM2021-04-28T04:33:50+5:302021-04-28T04:33:50+5:30
सभा तहकूब राजापूर : राजापूर पंचायत समितीची दि. २३ रोजी होणारी मासिक सभा कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे तहकूब करण्यात आली ...
सभा तहकूब
राजापूर : राजापूर पंचायत समितीची दि. २३ रोजी होणारी मासिक सभा कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे तहकूब करण्यात आली आहे. तालुक्यात सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. मोसम गावात टॅंकरची मागणी करण्यात आली आहे. राजापूर पंचायत समितीचा टॅंकर लांजा पंचायत समितीकडे असून संभाव्य पाणीटंचाई पाहता तो परत मिळणे गरजेचे आहे.
निर्जंतुकीकरणाची मागणी
रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या एटीएममध्येही निर्जंतुकीकरण करण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे. सोडियम हायपोप्लोराईडची फवारणी करण्यात यावी. एटीएममुळे कोरोना संसर्ग फैलावण्याचा धोका आहे.
गतिरोधक न बसवण्याची मागणी
रत्नागिरी : रत्नागिरी ते पावस या सागरी महामार्गाचे अनेक ठिकाणी डांबरीकरण पूर्ण झाले असून या मार्गावर पूर्वी असणारे गतिरोधक पुन्हा बसविले जाऊ नयेत, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. यापूर्वी या रस्त्यावर १२ गतिरोधक होते.
रस्त्याच्या कामाला सुरुवात
रत्नागिरी : तालुक्यातील काजरघाटी, टिके, हरचेरी, ओशी देवधे रस्ता वाहतुकीसाठी निकृष्ट बनला होता. याबाबत ग्रामस्थांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे रस्ता दुरुस्तीबाबत मागणी केली होती. त्यानुसार रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून निधी मंजूर झाला असून कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.
बदलीचे प्रस्ताव
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात ग्रामसेवकांनी जिल्हा बदलीचे प्रस्ताव दिले असून त्याची छाननी सुरू झाली आहे. जिल्ह्यात नऊ तालुक्यामध्ये असणाऱ्या विविध ग्रामपंचायतीमध्ये अनेक ग्रामसेवक काम करतात. ५० ग्रामसेवकांनी जिल्हा बदलीचे प्रस्ताव सादर केले आहेत.
काॅल सेंटर सुरू
रत्नागिरी : रत्नागिरीत होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. यामधून रुग्णांना आहाराची तसेच औषधे कशा प्रकारे घ्यावीत, आदीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. आहार कसा असावा, व्यायाम आदीची माहिती दिली जाणार आहे.
बॅंकांना सुटी
रत्नागिरी : खासगी व सार्वजनिक बॅंका मे महिन्यात एकूण नऊ दिवस बंद राहणार आहेत. बॅंकांच्या विविध सुट्यांमुळे पाच दिवस बॅंका बंद राहणार आहेत.या सुटीशिवाय दुसरा व चाैथा शनिवार जोडल्यास मे महिन्यात एकूण नऊ दिवस बॅंकांना सुटी मिळणार आहे.
फळांचे दरात वाढ
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची वाढती संख्या शिवाय फळांची होणारी आवक घटली आहे. कोरोना रुग्णांसाठी किवी, सफरचंद, कलिंगड, संत्री, मोसंबी यांना विशेष मागणी होत आहे. लाॅकडाऊनमुळे फळांची आवक मंदावली असल्याने दरात वाढ झाली असल्याचे विक्रेते सांगत आहेत.
साईडपट्टी बुजवण्याची मागणी
रत्नागिरी : शहरातील कोकणनगर येथे पाण्याच्या वाहिनीसाठी साईडपट्टी खोदण्यात आली होती. नगर परिषदेकडून साईटपट्टी बुजविण्यात आली आहे. रस्त्याला जोडूनच खडीकरण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शहरातील रस्ते अशाच पद्धतीने बुजविण्याची मागणी होत आहे.