चिपळूण तालुक्यातील सहा गावांतील आठ वाड्यांना पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:33 AM2021-04-02T04:33:18+5:302021-04-02T04:33:18+5:30

अडरे : चिपळूण तालुक्यातील सहा गावांतील आठ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे शासकीय टँकर उपलब्ध ...

Water shortage in eight villages in six villages of Chiplun taluka | चिपळूण तालुक्यातील सहा गावांतील आठ वाड्यांना पाणीटंचाईची झळ

चिपळूण तालुक्यातील सहा गावांतील आठ वाड्यांना पाणीटंचाईची झळ

Next

अडरे : चिपळूण तालुक्यातील सहा गावांतील आठ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे शासकीय टँकर उपलब्ध नसल्याने गतवर्षीप्रमाणेच खासगी टँकर अधिगृहित करून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने सुरू केलेले आहे.

तालुक्यातील नारदखेरकी अडरे, कोसबी, कादवड, कामथे खुर्द आणि नांदगाव ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्याची मागणी पंचायत समितीकडे केली आहे. मार्च महिना सुरू झाला की पाण्याचे स्त्रोत कमी होतात. परिणामी विहिरींचे पाणी आटल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडतात. सध्याही कडक उन्हाळा सुरू झाल्याने पाणी योजनांचे स्त्रोत कमी-कमी होऊ लागले आहेत.

गावातील पाणी योजनांवर त्याचा परिणाम होत आहे. परिणामी नियमितपणे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे टंचाईची दाहकता जाणवू लागल्याने तालुक्यातील सहा गावांनी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. गतवर्षीही खासगी टँकर घेऊन पाणीपुरवठा करण्यात आला होता. येत्या काही दिवसांत टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Water shortage in eight villages in six villages of Chiplun taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.