स्टेट बँक काॅलनीत रस्त्यावर पाणीच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:31+5:302021-07-07T04:39:31+5:30
रत्नागिरी : शहरातील स्टेट बँक कॉलनी येथे भोसले यांच्या निवासस्थानासमोर नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु पाण्याच्या दोन पाईपलाईनमुळे ...
रत्नागिरी : शहरातील स्टेट बँक कॉलनी येथे भोसले यांच्या निवासस्थानासमोर नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु पाण्याच्या दोन पाईपलाईनमुळे गटाराचा मार्ग बंद झाला आणि पाणी तुंबून भोसले यांच्या आवारात जाऊ लागले. ही समस्या भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांना कळताच त्यांनी ही समस्या मार्गी लावली.
शहरामध्ये सर्वत्र नवीन पाणी योजनेसाठी पाईपलाईनचे काम सुरू आहे. स्टेट बँक कॉलनी येथेही अशा प्रकारे काम करण्यात आले, आलीमवाडी येथे टाकी बसवण्यात येणार असल्याने त्यासाठी आणखी एक मोठा पाईप या ठिकाणी वरच्या भागात बसवण्यात आला. त्यावेळी चक्क गटार फोडून मधून पाईप टाकण्यात आली, यामुळे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला व पाणी तुंबण्यास सुरुवात झाली. तसेच हा भाग उताराचा असल्याने पावसामुळे वरच्या क्रांतीनगर या भागातील गटाराच्या चुकीच्या नियोजनामुळे कॉलनीत रस्त्यावर सुमारे फूटभर पाणी साचते. याठिकाणी प्रवीण देसाई व नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी यावर ताेडगा काढून ही समस्या मार्गी लावली.