अडरे गावाला पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:30 AM2021-04-18T04:30:35+5:302021-04-18T04:30:35+5:30
अडरे : चिपळूण तालुक्यात पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, सात गावांनी टँकरची मागणी केली हाेती. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी ...
अडरे : चिपळूण तालुक्यात पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, सात गावांनी टँकरची मागणी केली हाेती. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी शासकीय टँकर उपलब्ध हाेत नसल्याने खासगी टँकर घेण्यात आला आहे. अखेर ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अडरे गावाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. कडक उन्हामुळे पाणी योजनांचे स्रोत कमी-कमी होऊ लागले आहेत. गावातील पाणी योजनांवर त्याचा परिणाम होत आहे. परिणामी नियमितपणे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे टंचाईची दाहकता जाणवू लागल्याने तालुक्यातील नारदखेरकीस अडरे, कोसबी, कादवड, कामथे खुर्द आणि नांदगाव ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्याची मागणी पंचायत समितीकडे केली आहे. त्यातच सध्याच्या स्थितीला प्रशासनाकडे शासकीय टँकर उपलब्ध नाही. खासगी कंपन्या आणि स्थानिक टँकर अधिगृहीत करून ही प्रक्रिया पूर्ण केली. यावर्षी ५३ गावे ९६ वाड्यांचा समावेश पाणीटंचाई आराखडा करण्यात आला आहे. शासकीय टँकर उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर खासगी टँकर अधिग्रहण करून प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.