पूरग्रस्तांना पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:29 AM2021-07-26T04:29:06+5:302021-07-26T04:29:06+5:30
चिपळूण : स्वत:च्या मुलाच्या हातावर शस्त्रक्रिया झालेली असतानाही हे दु:ख बाजूला ठेवून नगरसेविका सई चव्हाण व शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुयोग ...
चिपळूण : स्वत:च्या मुलाच्या हातावर शस्त्रक्रिया झालेली असतानाही हे दु:ख बाजूला ठेवून नगरसेविका सई चव्हाण व शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण हे पती-पत्नी गेल्या दोन दिवसांपासून पूरग्रस्तांपर्यंत पाणी पोहोचवत आहेत. गरजूंना जेवणाचे वाटप करीत आहेत.
पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात
देवरुख : माजी आमदार सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, संगमेश्वर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांनी चिपळूण शहर परिसरातील पूरग्रस्तांना चादरी, ब्लँकेट, पाणी, नाश्ता, भोजनवाटप करून मदतीचा हात दिला आहे.
चिपळूणकरांची पाण्यासाठी वणवण
चिपळूण : येथील शहरात महापुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून वीजपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाणी नाही. शिवाय, ज्यांच्या विंधन विहिरी आहेत किंवा विहिरी आहेत, त्यामध्ये पुराचे पाणी घुसल्याने हे पाणीही सध्या वापरण्याजोगे नाही.
पुराच्या धसक्याने कामगार गावाकडे
चिपळूण : शहरात महापूर आल्याने आता अनेक समस्या उद्भवल्या आहेत. दोन-तीन दिवस उपासमार झाल्याने लोटे व खेर्डी औद्योगिक वसाहतींतील कामगारांनी गावाकडे जाणे पसंत केले आहे. तर, खेर्डीत काही कारखान्यांमध्ये पाणी आल्याने ते बंद आहेत.
पुलावरून वाहतूक पूर्ववत
राजापूर : खारेपाटण येथे शुक नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने खारेपाटण येथील ब्रिटिशकालीन पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शनिवारी दुपारपासून ही वाहतूक पोलिसांनी पूर्ववत सुरू केली. पूर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही वाहतूक बंद करण्यात आली होती.