टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:30 AM2021-04-21T04:30:59+5:302021-04-21T04:30:59+5:30

मिनी बसची मागणी खेड : खवटी, दिवाण खवटी सातपानेवाडीसाठी मिनी एस. टी. बस सेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून ...

Water supply by tanker | टँकरद्वारे पाणीपुरवठा

टँकरद्वारे पाणीपुरवठा

googlenewsNext

मिनी बसची मागणी

खेड : खवटी, दिवाण खवटी सातपानेवाडीसाठी मिनी एस. टी. बस सेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. सभापती मानसी जगदाळे यांना निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम सुरू असून, सभापती जगदाळे यानी सातपानेवाडीला भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थी, कामगार यासाठी एसटीची मागणी केली.

आयुष्मानसाठी मुदतवाढ

रत्नागिरी : आयुष्मान भारत योजनेंतर्गत आयुष्मान कार्ड बनविण्यासाठी केंद्र सरकारने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्डसाठी शुल्क आकारणी रद्द करून मोफत नोंदणी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेंतर्गत नावनोंदणीची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

बजेट कोलमडले

रत्नागिरी : कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव व महागाई यामुळे ग्रामीण व शहरी भागातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तेलाचे वाढते दर, कडधान्य, डाळींच्या दरातील वाढ, इंधन दरवाढ यामुळे दरमहा आर्थिक गणित जुळविणे अवघड झाले आहे. अनेकांना लॉकडाऊनमुळे नोकऱ्या, रोजगार गमवावे लागले आहेत.

बॉण्ड पेपरची उपलब्धता व्हावी

रत्नागिरी : शहरात ३१ मार्चपासून बॉण्ड पेपरचा तुटवडा भासत आहे. बॉण्ड पेपर विक्रेत्यांचा परवाना अद्याप नूतनीकरण करण्यात आला नसल्याने बॉण्ड पेपर उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून बॉण्ड पेपरची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

प्रश्नमंजूषा स्पर्धा

रत्नागिरी : बॅ. नाथ पै सेवांगणातर्फे २५ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ विषयावर प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन स्पर्धा होणार असून प्रश्न सेवांगण उपक्रम समूह व सेवांगण फेसबुक पेजवर पाठविले जाणार आहे. यशस्वी स्पर्धकांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

कचरा उचलण्याची मागणी

खेड : शहरातील भोस्ते मार्गे रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या मार्गालगत जगबुडी पुलाजवळ भोस्ते गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे. कचरा उचलण्याकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रक्तदान शिबिराला प्रतिसाद

रत्नागिरी : राष्ट्रवादी युवक बेसिक विद्यार्थी व सर्व सेल्स आयोजित जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ या टॅगलाइनखाली आयोजित शिबिराला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, प्रदेश सचिव बंटी वणजू, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर उपस्थित होते.

सहकार्याचे आवाहन

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्य:स्थितीत ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. याशिवाय औषधे, बेडस् सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशा सर्व लढाई जिल्ह्यातील उद्योजकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वर्धापन दिन साजरा

लांजा : सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणाऱ्या संस्कृती फाऊंडेशनचा आठवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र यांना चहा, बिस्कीट वाटप करण्यात आले.

Web Title: Water supply by tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.