वेलदूर, धोपावे, सागरी त्रिशूळ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:30 AM2021-05-23T04:30:04+5:302021-05-23T04:30:04+5:30
गुहागर : जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या पाठपुराव्यानंतर तालुक्यातील वेलदूर, धाेपावे, सागरी त्रिशूळ या टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे ...
गुहागर : जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या पाठपुराव्यानंतर तालुक्यातील वेलदूर, धाेपावे, सागरी त्रिशूळ या टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला असल्याची माहिती गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी तालुक्यातील पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांची माहिती घेतली हाेती. या वेळी दरवर्षी वेलदूर गावाला आरजीपीपीएल कंपनीकडून टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अद्याप सुरू झाला नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची दखल घेत आरजीपीपीएल कंपनी प्रशासनाशी संपर्क साधत तातडीने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार १५ मेपासून वेलदूर गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तसेच दरवर्षी धोपावे व सागरी त्रिशूळ गावाला पाणीटंचाई भासत असल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. याबाबत प्रांताधिकारी यांनी खासगी टँकर अधिग्रहित करण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार १७ मेपासून टँकर उपलब्ध होऊन धोपावे व सागरी त्रिशूळ गावांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे.