एकमेकांना मदत करूनच संकटाशी दाेन हात करणे गरजेचे : सुहास राजेशिर्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:19+5:302021-06-02T04:24:19+5:30
अडरे : कोरोनाच्या काळात एकमेकांना मदत करूनच या संकटाशी दोन हात करणे गरजेचे आहे. ज्या मातीला, ज्या माणसांना मी ...
अडरे : कोरोनाच्या काळात एकमेकांना मदत करूनच या संकटाशी दोन हात करणे गरजेचे आहे. ज्या मातीला, ज्या माणसांना मी लहानपणीच दुरावलो, त्यांची आठवण या संकटकाळात मला आवर्जून झाली. माझ्या परीने मी माझ्या मातीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सुहास राजेशिर्के यांनी सांगितले.
चिपळूण तालुक्यातील वेहेळे गावचे सुपुत्र सुहास राजेशिर्के यांनी गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बाेलत हाेते़ यावेळी सरपंच दिलीप राजेशिर्के यांच्या हस्ते सुहास राजेशिर्के यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुमारे ६० ग्रामस्थांना धान्य किटचे वाटप करण्यात आले़ यावेळी वेहेळे गावचे सरपंच दिलीप राजेशिर्के, माजी उपसरपंच प्रकाश भोजने, राष्ट्रवादी काँग्रेसचे पोफळी गट युवक अध्यक्ष उदय भोजने, ग्रामपंचायत सदस्य रोहित गमरे, निकिता राजेशिर्के, मृणाली कदम, अनंत लंबाडे, नितीन राजेशिर्के, राम राजेशिर्के, संजय जाबरे, शांताराम जाबरे, बाळा घाणेकर, मंदार राजेशिर्के, उदय शिर्के, संतोष कदम, संदेश महाडिक, सुशील खेडेकर, सतीश राजेशिर्के, संजय पडयाल, संजय होडे, यतीराज होडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन उदय भोजने व राम राजेशिर्के यांनी केले.
---------------------
चिपळूण तालुक्यातील वेहेळे येथील ग्रामस्थांना सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते धान्य किटचे वाटप करण्यात आले़