शेतजमिनींसाठी नियम शिथील करू : अब्दुल सत्तार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:34 AM2020-10-31T11:34:02+5:302020-10-31T11:36:30+5:30

farmar, Abdul Sattar, minister, konkan, Ratnagiri कोकणातील खाडीकिनारी वसलेल्या गावांच्या शेतजमिनी संरक्षित करण्यासाठी खारभूमी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने त्याचे मापदंड शिथील करून शेतकऱ्यांना शेतीहीन करण्यापासून वाचवणार असल्याचे प्रतिपादन खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते आमदार योगेश कदम यांच्या मंडणगड येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.

We will relax the rules for agricultural lands: Abdul Sattar's information | शेतजमिनींसाठी नियम शिथील करू : अब्दुल सत्तार यांची माहिती

शेतजमिनींसाठी नियम शिथील करू : अब्दुल सत्तार यांची माहिती

Next
ठळक मुद्देखारभूमी बंधारे बांधण्याला प्राधान्य वाळू उत्खननाबाबत सकारात्मक भूमिका

मंडणगड : कोकणातील खाडीकिनारी वसलेल्या गावांच्या शेतजमिनी संरक्षित करण्यासाठी खारभूमी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने त्याचे मापदंड शिथील करून शेतकऱ्यांना शेतीहीन करण्यापासून वाचवणार असल्याचे प्रतिपादन खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्रीअब्दुल सत्तार यांनी केले. ते आमदार योगेश कदम यांच्या मंडणगड येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी सत्तार म्हणाले की, आमदार योगेश कदम यांनी दापोली मतदार संघातील खाडीकिनारी वसलेल्या जनतेच्या विविध समस्या व अडचणी आपल्या निदर्शनाला आणून दिल्या आहेत. खाडी किनाऱ्यावरील गावे व शेत जमिनीत खाडीचे पाणी शिरत असल्याने जमीन नापीक होत आहे.

याठिकाणी कांदळवन उगवत असल्याने शेतकरी भूमिहीन होऊ लागले आहेत. याबाबत सत्तार यांनी खारभूमी बंधारे बांधण्याबाबत असणाऱ्या मापदंडात बदल होणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासन दरबारी वास्तव परिस्थिती मांडून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. खार बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या जागा नापीक होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बंद असलेल्या जिल्ह्यातील चिरेखाणी अल्पावधीतच सुरू करणार असल्याचे संकेत दिले. आमदार योगेश कदम यांनी याविषयीची भूमिका मांडली असून, यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातच चिरेखाणी सुरू होण्यार असल्याचे सत्तार म्हणाले.

दापोली तसेच मंडणगड तालुक्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळात घरांचे, शासकीय इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची पुनर्बांधणी करण्याकरिता वाळू हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, सावित्री खाडीत वाळू उत्खनन करण्याबाबत कोणताही निर्णय शासनाने अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जादा दराने वाळू खरेदी करावी लागत असल्याचे आमदार कदम यांनी त्यांच्या निदर्शनाला आणून दिले.

सावित्री खाडीत पूर्वीचे निकष सांभाळून हातपाटीद्वारे वाळू उत्खननाला परवानगी देण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासह प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, आमदार योगेश कदम, शिवसेनेचे मंडणगड तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: We will relax the rules for agricultural lands: Abdul Sattar's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.