दापाेली काॅलेजतर्फे वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:25+5:302021-08-20T04:35:25+5:30
दापाेली : येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘प्रयोगशाळा आदर्श ...
दापाेली : येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘प्रयोगशाळा आदर्श कार्यपद्धती आणि सुरक्षितता’ या विषयावर ऑनलाइन वेबिनार पार पडले.
यावेळी उपस्थितांचे स्वागत डॉ. रघुनाथ घालमे यांनी केले. वेबिनारचे समन्वयक प्रा. संतोष मराठे यांनी उपस्थितांची ओळख करून दिली. वेबिनारमध्ये व्याख्याते डॉ. प्रल्हाद रेगे यांनी प्रयोगशाळा आदर्श कार्यपद्धती, प्रयोगशाळेत घ्यायची काळजी, स्वसंरक्षण, पीपीई किटचा उत्तम वापर याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्याख्यानानंतर डॉ. प्रल्हाद रेगे यांनी रसायनांमुळे घडणाऱ्या दुर्घटना आणि त्याप्रसंगी बाळगायची सावधगिरी यासंदर्भात काही व्हिडिओही दाखविले. या वेबिनारला एकूण १०० विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सहभाग दर्शविला. डॉ. गंगा गोरे यांनी आभार मानले, तसेच या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी प्रा. शंतनु कदम यांनी तांत्रिक सहकार्य केले.