corona virus : लांजातील आठवडा बाजार थंडथंडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 01:46 PM2020-11-12T13:46:44+5:302020-11-12T13:49:29+5:30

Coronavirus, lanja, market, ratnagirinews, Lanja Nagar Panchayat आठ ते नऊ महिन्यानंतर लांजा तालुक्याच्या ठिकाणी मंगळवारी भरविण्यात आलेल्या आठवडा बाजाराला ग्राहकांचा व जिल्ह्याबाहेरील व्यापाऱ्यांचा थंड प्रतिसाद लाभल्याने बाजारात म्हणावी तशी गर्दी दिसून येत नव्हती.

The weekly market in Lanza is cold | corona virus : लांजातील आठवडा बाजार थंडथंडच

corona virus : लांजातील आठवडा बाजार थंडथंडच

googlenewsNext
ठळक मुद्देलांजातील आठवडा बाजार थंडथंडच अनेक महिन्यांनी भरलेल्या बाजारात ग्राहकांसह व्यापारीही कमीच

लांजा : आठ ते नऊ महिन्यानंतर लांजा तालुक्याच्या ठिकाणी मंगळवारी भरविण्यात आलेल्या आठवडा बाजाराला ग्राहकांचा व जिल्ह्याबाहेरील व्यापाऱ्यांचा थंड प्रतिसाद लाभल्याने बाजारात म्हणावी तशी गर्दी दिसून येत नव्हती.

मार्च महिन्यामध्ये कोरोना महामारीचे देशावर मोठे संकट ओढवल्याने संपूर्ण देश लाकडाऊन करण्यात आला होता. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लांजा तालुक्याच्या ठिकाणी मंगळवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजारही प्रशासन व व्यापारी यांनी येथील जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद केला होता.

या आठवडा बाजारामध्ये तालुक्याच्या ग्रामीण भागातील ग्राहक आठवड्याचा बाजार खरेदीसाठी मोठी गर्दी करतात. बाजाराला पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी मोठ्या प्रमाणात येऊन आपला माल विक्री करतात. यामुळे कोरोनाचा मोठा प्रसार होऊ शकतो, अशी भीती येथील प्रशासन व व्यापारीवर्गाला होती. त्यामुळे खबरदारी म्हणून बाजार बंद करणे येथील जनतेच्या हिताचेच होते.

तालुक्याच्या ठिकाणी भरविण्यात येणार आठवडा बाजार कधी सुरु होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, मंगळवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार सुरु होत असल्याचे प्रशासनाने सोमवारी जाहीर केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी यांना व तालुक्यातील ग्राहकांना यांची माहिती मिळाली नसल्याने मोजकेच व्यापारी व मोजकेच ग्राहक दिसत होते.


एक दिवस आधी जाहीर केल्यामुळे प्रतिसाद कमी

सध्या दिवाळीचा सण व कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी घट पाहता आठवडा बाजार सुरु करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच सोमवारी प्रशासनाने मंगळवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजाराला परवानगी दिल्याने तब्बल नऊ महिन्याच्या कालावधीनंतर मंगळवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार सुरु झाला आहे. मात्र एक दिवस आधी त्याबाबतची घोषणा केल्यामुळे त्याची माहिती व्यापारी तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचली नसल्याने हा प्रतिसाद कमी असल्याचा अंदाज आहे.
 

Web Title: The weekly market in Lanza is cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.