चिपळुणात श्री रामराज्य रथयात्रेचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 04:56 PM2022-11-04T16:56:00+5:302022-11-04T16:56:18+5:30

विश्व हिंदू परिषद चिपळूणतर्फे श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानने या यात्रेच्या स्वागताचे यजमानपद स्वीकारले होते.

Welcome to Sri Ram Rajya Rathyatra in Chiplun | चिपळुणात श्री रामराज्य रथयात्रेचे स्वागत

चिपळुणात श्री रामराज्य रथयात्रेचे स्वागत

Next

चिपळूण : अयोध्येतील राम मंदिर ट्रस्ट व विश्व हिंदू परिषदेतर्फे संपूर्ण भारतभर २७ राज्यातून श्री रामराज्य रथयात्रा काढली जात आहे. चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथे काल, गुरुवारी दुपारी ११.३० वाजता ही यात्रा दाखल झाली. या रथ यात्रेचे चिपळूणकरांनी जल्लोषात स्वागत केले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर श्री रामराज्य रथयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. सध्या ही यात्रा कोकणात दाखल झाली आहे. विश्व हिंदू परिषद चिपळूणतर्फे श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानने या यात्रेच्या स्वागताचे यजमानपद स्वीकारले होते. शहरातील पेठमाप येथील शिवनेरी चौक येथे रथयात्रेचे आगमन झाले. त्यानंतर गोवळकोट येथील नगर परिषदेच्या मैदानावर यात्रेचे स्वागत केले.

यावेळी श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष प्रसाद चिपळूणकर, वसंत भैरवकर, उदय जुवळे, सुरेश शिंदे, उपेंद्र हरवडे, सुरेश कदम, संतोष टाकळे, तुषार रेडीज, सतीश शिंदे, श्रीराम शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे उदय चितळे उपस्थित होते. त्यानंतर शहरातील शिवाजी चौक, तसेच जुना भैरी देवस्थान व सुकाई मंदिर पाग देवस्थान येथे रथ यात्रेच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Welcome to Sri Ram Rajya Rathyatra in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.