मंडणगडात बोरीचा माळ येथील विहीर कोसळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:21 AM2021-06-20T04:21:48+5:302021-06-20T04:21:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : मंडणगड नगरपंचायत हद्दीतील बोरीचा माळ या प्रभागातील मोरीच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या खासगी मालकीच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : मंडणगड नगरपंचायत हद्दीतील बोरीचा माळ या प्रभागातील मोरीच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या खासगी मालकीच्या जागेतील विहीर व संरक्षक भिंत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली आहे. याकडे नगरपंचायतीने वेळेवर लक्ष न दिल्याने वाहतुकीचा रस्ता बंद झाला आहे.
पाच दिवसांपूर्वी प्रथम मोरीच्या बाजूस असलेली संरक्षक भिंत कोसळली़, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मोरीच्या कठड्याला लागून असलेली भिंत कोसळल्याची बाब नगरपंचायत व सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली़ भिंतीला लागूनच विहीर असल्याने विहिरीलाही धोका निर्माण होऊ शकतो, असे नागरिकांनी सांगितले हाेते़ विहीर मालकासही याबाबत सूचना करण्यात आली हाेती़ नगरपंचायतीने विहीर मालकास पत्रव्यवहार केला़; मात्र मालक कामानिमित्त बाहेर असल्याने हा विषय तसाच प्रलंबित राहिला़ विहिरीची संरक्षक भिंत
आरल्याने पाडलेकर
यांच्या घराला धोका निर्माण झाला. पावसाच्या पाण्यासह पऱ्याचे पाणीही खड्ड्यात शिरले़ त्यानंतर नगरपंचायतीस जाग आली असून, मोरीची संरक्षक भिंत असलेल्या परिसरात ट्रॅक्टर व जेसीबीनेे भरावयाचे काम हाती घेण्यात आले आहे.
यावेळी माजी नगरसेवक आदेश मर्चंडे, विनोद जाधव, नगरपंचायतीचे मनोज मर्चंडे, पाडलेकर उपस्थित होते. सरंक्षक भिंती कोसळ्याने विहीर व परिसरातील घरास धोका उत्पन्न झाल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली़ नगरपंचायत व्यवस्थापनाने पंचनामा व पत्रप्रपंचाच्या पलीकडे कोणतेही काम केलेले नाही़ आपत्ती व्यवस्थापनाकडे सूचना मिळूनही डोळेझाक करण्याच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीविषयी परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
----------------------
मंडणगड तालुक्यातील बोरीचा माळ येथे विहीर काेसळली आहे़