लॉकडाऊनमुळे रोजी गेली; रोटी देणार शिवभोजन थाळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 03:00 PM2021-04-16T15:00:16+5:302021-04-16T15:02:25+5:30
Lockdaown Ratnagiri Shivbhojan : संख्या वाढू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट होऊ लागल्याने आता शासनाने गुरूवारपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत गरजू लोकांची गैरसोय होवू नये, यासाठी लॉकडाऊन काळात शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या मोफत थाळीचा लाभ जिल्ह्यातील ३००० गरजू लोकांना होणार आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : संख्या वाढू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट होऊ लागल्याने आता शासनाने गुरूवारपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत गरजू लोकांची गैरसोय होवू नये, यासाठी लॉकडाऊन काळात शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या मोफत थाळीचा लाभ जिल्ह्यातील ३००० गरजू लोकांना होणार आहे.
कामगार, कष्टकरी तसेच आर्थिक दुर्बल लोकांची उपासमार होवू नये, यासाठी आघाडी सरकारने दहा रूपयांत शिवभोजन थाळी सुरू केली. गेल्या लॉंकडाऊन काळात ही थाळी ५ रूपयांमध्ये देण्यात येत होती. त्यामुळे लॉकडाऊन काळात हातातील काम गेलेल्या कामगारांना शिवभोजन थाळींने आधार दिला.
आता पुन्हा काही महिन्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने कष्टकरी लोकांना महिनाभर शिवभोजन थाळी मोफत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या लोकांची उपासमार टळणार आहे.
बाहेर गावच्या लोकांना शहराच्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या कामासाठी यावे लागते. काही वेळा अख्खा दिवस जातो. अशावेळी हॉटेलात भरमसाठ पैसे भरून जेवण घेणे सामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळे आता शासनाने सुरू केलेल्या या शिवभोजनमुळे आता मोफत जेवण मिळणार आहे.
- रमेश पवार, मालगुंड
शासनाने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन थाळीमुळे आता ५ रूपयांमध्ये पोटभर जेवण मिळत आहे. इतर हॉटेलमध्ये १०० - १५० रूपयांना मिळणारे जेवण गरीबांना परवडणारे नाही. मात्र, शासनाने शिवभोजन सुरू केल्याने गरीबांना पाच रूपयांत चांगले जेवण मिळू लागले आहे.
- सुरेखा कुवेसकर, जैतापूर