पोरबाळ अन् जनावरांना काय खायला घालायचं?, शेतकऱ्यांची आर्त विनवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 04:25 PM2019-11-07T16:25:45+5:302019-11-07T16:27:46+5:30

क्यार वादाळामुळे बदललेल्या वातावरणातून अवेळी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. तसेच प्रशासनाने माहा चक्रीवादळाचा इशारा दिल्याने यापूर्वीच जमेल तेवढे पीक वाचविण्याची कसरत शेतकरी करत आहे. आता आम्ही कसं जगायचं? पोराबाळांना काय खायला घालायचं? असा सवाल रडवेल्या अवस्थेत केला.

What to feed the turtle and the animals ?, the farmers beg | पोरबाळ अन् जनावरांना काय खायला घालायचं?, शेतकऱ्यांची आर्त विनवणी

पोरबाळ अन् जनावरांना काय खायला घालायचं?, शेतकऱ्यांची आर्त विनवणी

Next
ठळक मुद्देपोरबाळ अन् जनावरांना काय खायला घालायचं?, शेतकऱ्यांची आर्त विनवणीभौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या गुहागर तालुक्यात भातशेतीचे नुकसान

संकेत गोयथळे

गुहागर : क्यार वादाळामुळे बदललेल्या वातावरणातून अवेळी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. तसेच प्रशासनाने माहा चक्रीवादळाचा इशारा दिल्याने यापूर्वीच जमेल तेवढे पीक वाचविण्याची कसरत शेतकरी करत आहे. आता आम्ही कसं जगायचं? पोराबाळांना काय खायला घालायचं? असा सवाल रडवेल्या अवस्थेत केला.

शेतावर कामाच्या लगबगीत शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यामधून शेतकऱ्यांची मानसिक स्थिती किती ढासळली आहे हे लक्षात आले. शेतावर भेट घेतली असता साऱ्यांच्याच चेहऱ्यावर फक्त चिंता होती. साहेब काही तरी करा हो. एवढी मेहनत करुन थोडे पीक तरी हातात लागायला हवे होते.

आज बोलावलेल्या मजुरांना ४०० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागते. पैसे खर्च होऊनही पूर्ण नुकसानच होणार असेल तर चालणार कसे? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी विचारले. वेळंब येथील सचिन माळी यांनी सांगितले की, गेले चार दिवस फक्त भिजलेला पेंढाच बाजूला करुन तो सुकवत आहोत.

बहुतांश पेंढा ओला होऊन फुकट गेला आहे. आता या शेतामधून जे मिळेल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईमध्ये प्लंबिंग काम करतो. आई, बायको शेती बघतात. त्यांना मदत करण्यासाठी आलो. पण येथील स्थिती चिंताजनक आहे.

तालुक्यात १२२ गावे असून, काम जलदगतीने व्हावे, यासाठी तलाठी २२ गावे, ग्रामसेवक ५७, तर कृषी सहाय्यक ४३ अशा विभागणीने पंचनामे करण्यात आले. दि. २ नोव्हेंबरला अंतिम तारीख देण्यात आली होती. या दिवशी रविवार असूनही तलाठ्यांकडून आवश्यक सातबारे उपलब्धता व अर्ज भरुन घेण्यात आले.

सोमवारी प्रांताधिकाऱ्यांनी विशेष भेट देऊन कामाचा आढावा घेतला व मंगळवारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्ज आल्याचे तालुका कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

उत्पादन निम्म्याहून घटले

अनेक शेतकऱ्यांकडे गुरे आहेत. शेतातून आलेला पेंढा वर्षभर गुरांना पुरवतात. मात्र ओला पेंढा फेकून देण्याची वेळ आली आहे. या पेंढ्यात अळ्या होत आहेत. अनेक शेतकरी दुसऱ्याची शेती अर्धळीवर करत असतात. त्याची स्वत:ची शेती नसते. अशाच वेळंब येथील विजया कुंभार यांनी सांगितले की, गेल्यावर्षी २२ गुंठ्याला दोन खंडी भात मिळालं. आज १० मण मिळेल की, नाही सांगता येत नाही.

किती क्षेत्र झाले बाधित?

तालुक्यात ३ हजार १२८ इतकी शेतकरी संख्या आहे. यापैकी २ हजार ९४७ शेतकऱ्यांचे एकूण ५५१.२७ हे. आर. क्षेत्रापैकी ५२२.३ हेक्टर आर क्षेत्रात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अंदाजे ३७ कोटी ४८ हजार ६३६ एवढी नुकसान भरपाई मिळू शकते. शासनाच्या बदलत्या निकषानुसार यामध्ये कमी जास्त बदल होऊ शकतो, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.

गेले आठ दिवस शेतावरच आहोत. उरले सुरले पीक मिळविण्यासाठी पुन्हा पाऊस पडण्याआधीच ह्यमळणीह्ण काढायला घेत आहोत. शासनातर्फे चालू असलेले पंचनामे तसेच यासाठी अर्ज करण्याबाबत आपल्याला अद्याप काहीच माहिती नसल्याचे सांगत शेत वाचवायचं की, शासनाकडून मिळणाऱ्या तूटपुंज्या अनुदानासाठी फेऱ्या मारायच्या. त्यापेक्षा शासनाने सर्वांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी.
- अनंत गावडे,
कीर्तनवाडी, गुहागर


भिजलेल्या पेंढ्या हाताळतानाच भाताच्या लोंब्या (अर्ध्या अधिक) जमिनीवर पडत आहेत. यामुळे एवढ्या मेहनतीनंतरही फार कमी पीक शेवटी मिळत आहे. जमिनीवर पडलेला एक एक दाणा आणि भाताच्या लोंब्या एकत्रित ताडपत्रीवर घेऊन अनेक ठिकाणी सुकविताना शेतकरी दिसत आहे. पुन्हा पाऊस येण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकरी घराची पडवी तसेच अंगणात आणलेले भात झोडताना दिसत आहेत.
- सुनीता शिंदे, वरवेली शिंदेवाडी
- सुनील माळी, वेळंब

Web Title: What to feed the turtle and the animals ?, the farmers beg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.