दोन वर्षं झाली की हो; २२ गावकऱ्यांचा बळी घेणाऱ्या तिवरे धरणफुटीचा अहवाल कुठे मुरला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:21 AM2021-06-28T04:21:51+5:302021-06-28T15:21:42+5:30

संदीप बांद्रे चिपळूण : तालुक्यातील तिवरे - भेंदवाडी येथील धरणफुटीला दोन वर्षे पूर्ण होत आली तरी याप्रकरणी अद्याप कोणावरही ...

It's been two years; 22 Where is the report of Tiware dam breach that claimed the lives of villagers? | दोन वर्षं झाली की हो; २२ गावकऱ्यांचा बळी घेणाऱ्या तिवरे धरणफुटीचा अहवाल कुठे मुरला?

दोन वर्षं झाली की हो; २२ गावकऱ्यांचा बळी घेणाऱ्या तिवरे धरणफुटीचा अहवाल कुठे मुरला?

Next

संदीप बांद्रे

चिपळूण : तालुक्यातील तिवरे - भेंदवाडी येथील धरणफुटीला दोन वर्षे पूर्ण होत आली तरी याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. या दुर्घटनेनंतर शासनाने स्थापन केलेले विशेष चौकशी पथक व पुनर्विलोकन समिती यांचे अहवाल अद्यापही गुलदस्त्यात का आहेत? तिवरे धरणफुटीप्रकरणी संबंधित जबाबदार लोकांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न चिपळूणवासीयांमधून विचारला जात आहे.

तालुक्यातील तिवरे - भेंदवाडी येथील धरण २ जुलै २०१९ रोजी फुटल्याने मोठी जीवित व वित्तहानी झाली. यामध्ये २२ ग्रामस्थांचा नाहक बळी गेला. या दुर्घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेत ६ जुलै २०१९ रोजीच्या आदेशान्वये या जीवित व वित्तहानीप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमले. या पथकात पथक प्रमुख अविनाश सुर्वे (सचिव, जलसंपदा तथा कार्यकारी संचालक, विदर्भ सिंचन विकास महामंडळ, नागपूर), सदस्य - मुख्य अभियंता (लघुसिंचन) जलसंधारण, जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांचा समावेश करण्यात आला. या पथकाने तिवरे धरणफुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे व त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे, लघु सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, माल गुजारी तलाव व इतर तत्सम बाबतीत भविष्यात अशा घटना घडू नयेत, याकरिता उपाय सुचवणे. या पथकाने आपला अहवाल दोन महिन्यांच्या आत शासनाला सादर करावा, असे या आदेशानव्ये स्पष्ट करण्यात आले होते.

त्यानुसार या विशेष पथकाने आपला अहवाल सादर केल्यानंतर पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली. या समितीला आणखी दोन महिन्यांची म्हणजेच २० फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, या पुनर्विलोकन समितीच्या अहवालाचे पुढे काय झाले, हे अजूनही कळले नाही. एकंदरीत तिवरे धरणफुटीप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच तिवरे धरणग्रस्तांचे अद्यापही काही प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे तिवरे धरणग्रस्तांसह मृत ग्रामस्थांना न्याय मिळणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Web Title: It's been two years; 22 Where is the report of Tiware dam breach that claimed the lives of villagers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.