मध्यरात्री खोल दरीत कार कोसळली; देवरूख पोलिस देवदूत बनून आले, अन् कोल्हापूरचे दाम्पत्य बचावले

By अरुण आडिवरेकर | Published: April 10, 2023 03:59 PM2023-04-10T15:59:53+5:302023-04-10T16:08:03+5:30

घाटात समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्याने समोर रस्ता दिसला नाही आणि काही सेकंदामध्येच कार थेट १०० फूट खोल दरीत कोसळली.

While going to Kolhapur from the village, the car crashed into the Khael valley, Kolhapur couple saved thanks to Devrukh police | मध्यरात्री खोल दरीत कार कोसळली; देवरूख पोलिस देवदूत बनून आले, अन् कोल्हापूरचे दाम्पत्य बचावले

मध्यरात्री खोल दरीत कार कोसळली; देवरूख पोलिस देवदूत बनून आले, अन् कोल्हापूरचे दाम्पत्य बचावले

googlenewsNext

देवरुख : खेडमधून काेल्हापूरकडे जात असताना कार १०० फूट खाेल दरीत काेसळल्याची घटना ८ एप्रिल राेजी मध्यरात्री रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील साखरप्यापासून २ किलाेमीटर अंतरावर मुरडे घाटात घडली. कार खोल दरीत कोसळूनही संयम न सोडता तातडीने ११२ क्रमांकावरून माहिती दिल्याने अवघ्या १५ मिनिटात देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गाडीतून तिघांना सुखरुप बाहेर काढत जीव वाचवला. या अपघातग्रस्त कुटुंबियांसाठी देवरूखचे पाेलिसच देवदूत बनून आले हाेते.

कोल्हापूरचे विनायक मढवळ (३३), पत्नी सिद्धी मढवळ (३२) आणि त्यांची मुलगी मीरा (४) हे कारने (एमएच ०९, एफजे ८९७२) खेडमधून कोल्हापूरला जात होते. रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील साखरप्यापासून पुढे २ किलाेमीटर अंतरावर मुरडे घाटात समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्याने विनायक यांना समोर रस्ता दिसला नाही आणि काही सेकंदामध्येच कार थेट १०० फूट खोल दरीत कोसळली.

कार दरीत कोसळली, त्यावेळी मध्यरात्रीचे २ वाजले होते. विनायक यांच्या पत्नी सिद्धी यांनी मोठ्या धैर्याने नातेवाईकांना आणि ११२ नंबरवरून देवरूख पोलिसांना मध्यरात्री २ वाजून ९ मिनिटांनी फाेन केला. त्यांनी माहिती देत आमचा अपघात झाला असून, आम्हाला तत्काळ मदत हवी असल्याचे सांगितले.

देवरुख पोलिस स्थानकात राहुल गायकवाड होते. ते पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत नागवेकर, चालक पोलिस कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांच्यासह अवघ्या १५ मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोरीच्या मदतीने दरीत उतरून प्रथम गाडीच्या डिकीतून मुलगी मीरा हिला तर त्यानंतर विनायक आणि सिद्धी यांना सुखरूप दरीतून बाहेर काढले.

मध्यरात्री कोणीही मदतीला नसताना देवरूख पोलिसांच्या या मदतीमुळे मढवळ दाम्पत्याला अश्रू अनावर झाले. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हे कुटुंब या अपघातातून बचावले. देवरुख पाेलिसांनी दाखविलेल्या या तत्परतेबाबत त्यांनी त्यांचे आभार मानले.

Web Title: While going to Kolhapur from the village, the car crashed into the Khael valley, Kolhapur couple saved thanks to Devrukh police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.