कोण किरीट सोमय्या, भाजपने असे १०० सोमय्या सोडलेत - भास्कर जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 06:34 PM2022-06-24T18:34:44+5:302022-06-24T18:35:19+5:30

किरीट सोमय्या यांच्याबाबत विचारले असता भास्कर जाधव संतापले

Who is Kirit Somaiya, BJP released 100 such Somaiya says Bhaskar Jadhav | कोण किरीट सोमय्या, भाजपने असे १०० सोमय्या सोडलेत - भास्कर जाधव

कोण किरीट सोमय्या, भाजपने असे १०० सोमय्या सोडलेत - भास्कर जाधव

Next

चिपळूण : ही वेळ आव्हानात्मक भाषा वापरण्याची नाही. ही वेळ आहे की, ‘भूला हुवा शाम घर आया, तो उसे भूला नही कहते’ म्हणण्याची आणि कृतीमध्ये उतरविण्याची वेळ आहे. ही एकमेकांना आव्हाने - प्रतिआव्हाने देण्याची वेळ नाही, त्याने प्रश्न सुटेल असे नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी बुद्धिचातुर्य वापरा, असा सल्ला आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे मुख्य पक्षप्रवक्ते संजय राऊत यांना दिला आहे.

गुहागरचे आमदार भास्कर जाधव शुक्रवारी चिपळूण येथील आपल्या गावी आले असता, प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. संजय राऊत यांनी मुंबईत येऊन आमच्यासोबत बसा, असे ट्वीट केले हाेते. एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर त्यांची मनधरणी होऊ शकते का, असा प्रश्न पत्रकारांनी भास्कर जाधव यांना विचारला. त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, संजय राऊत हे आमचे मुख्य प्रवक्ते आहेत. त्यांना सल्ला देण्याइतका मी माेठा नाही.

संवाद हा लोकशाहीचा आत्मा

तरीही त्यांना नम्रपणे विनंती करेन की, ही वेळ आव्हानात्मक भाषा वापरण्याची नाही. आव्हाने - प्रतिआव्हाने देऊन हा प्रश्न सुटेल असे नाही. घटनात्मक तरतुदीचा आधार घ्या. त्याचबरोबर संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. आव्हानात्मक भाषा वापरण्याऐवजी संवादात्मक भाषा वापरूया, जोडण्याची भाषा वापरूया, आपली माणसे आहेत, ती आपल्या जवळ येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आमदार जाधव म्हणाले.

कोण किरीट सोमय्या?

संजय राऊत वारंवार प्रसार माध्यमांसमोर येऊन किरीट सोमय्या यांच्याविरोधात बोलायचे, त्यावर भास्कर जाधव यांना विचारले असता, काय किरीट सोमय्या घेऊन बसलात? कोण किरीट सोमय्या, असा प्रति प्रश्नच त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाने असे १०० सोमय्या सोडलेले आहेत. महाराष्ट्र बघतोय, देश बघतोय असे ते म्हणाले

Web Title: Who is Kirit Somaiya, BJP released 100 such Somaiya says Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.